Full Width(True/False)

नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ₹ ७५००

नवी दिल्लीः नोकियाचा स्मार्टफोन बनवणारी कंपनी HMD Global ने आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. नोकिया सी ३ ला गेल्या महिन्यात चीनच्या सर्टीफिकेशन साइटवर लिस्ट करण्यात आले होते. नोकियाच्या या नवीन हँडसेटमध्ये ५.९९ इंचाचा एचडी प्लस स्क्रीन आणि अँड्रॉयड १० यासारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत. वाचाः Nokia C3 ची किंमत नोकिया सी ३ ला ६९९ चीनी युआन (जवळपास ७ हजार ५०० रुपये) किंमतीत लाँच करण्यात आले आहे. या फोनला नॉर्डिक ब्लू आणि गोल्ड सँड कलरमध्ये खरेदी करता येवू शकते. या स्मार्टफोनची विक्री १३ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. नोकियाच्या या फोनला खरेदी करण्यासाठी इच्छूक असणारे लोक चीनमध्ये फोनला प्री बुक करू शकतात. वाचाः नोकिया सी ३ ची खास वैशिष्ट्ये नोकियाच्या या फोनमध्ये रियरवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये साईडला एक एक्सप्रेस बटन दिले आहे. ज्यावरून गुगल असिस्टेंट अॅक्टिव केले जावू शकते. किंवा डबल क्लिक केल्यानंतर लॉग इन करुन दुसरे अॅप्स उघडता येवू शकते. नोकिया सी ३ मध्ये ५.९९ इंचाचा (1440 × 720 पिक्सल) एचडी+ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 1.6 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर Unisoc SC9863A प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी IMG8322 जीपीयू दिला आहे. हँडसेटमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला ४०० जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. वाचाः नोकियाचा हा फोन अँड्रॉयड १० वर काम करतो. फोन ड्यूल सिम सपोर्ट करतो. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, ग्लोनास, मायक्रो-यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये ३.५ एमएम ऑडियो जॅक आणि एफएफ रेडिओ सुद्धा दिला आहे. नोकिया सी ३ मध्ये एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 3040mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XpqbVo