Full Width(True/False)

अभिनेता समीर शर्माने पंख्याला लटकून केली आत्महत्या

मुंबई- अभिनेता समीर शर्माचा त्याच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे. पोलिसांना याबाबतीत आत्महत्याचा संशय आहे. मालाड येथील घरी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. समीरने 'काही घर घर की' सह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोणालाच भेटला नव्हता. जेव्हा त्याच्या घरातून दुर्गंध येऊ लागला तेव्हा सोसायटीच्या चौकीदाराने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी जेव्हा घर उघडलं तेव्हा समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. असं म्हटलं जातंय की दोन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असून शरीरातून दुर्गंध यायला सुरुवात झाली होती. यामुळे त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31oieRx