मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने () रिया चक्रवर्तीला समन्स पाठवला आहे. सुशांतची केस मनी लॉण्डिंगशी जोडली गेली असल्यामुळे ईडीने रियाला विचारण्यासाठी प्रश्नांची एक यादीच तयार केली आहे. ईडीने रियाला तिच्या मुंबईतील घरी आणि ईमेलमार्फत समन्स पाठवला आहे. असं म्हटलं जातं की ईडीची मुंबई ब्रान्च रियाची तीन भागांमध्ये चौकशी करणार आहे. यातील पहिल्या भागात तिला खासगी प्रश्न विचारण्यात येतील. यात रियाच्या वडिलांचं नाव काय, घरचा पत्ता काय आणि कुटुंबात किती व्यक्ती आहेत असे प्रश्न विचारण्यात येतील. कंपनीच्या उत्पन्नावर विचारले जातील प्रश्न यानंतर दुसऱ्या भागात रियाला तिच्या पॅनकार्डचे डिटेल, कंपनीचा टिन नंबर, मानधनाच्या मिळकतीचं साधन, इनकम टॅक्स रिटर्नची माहिती, कंपनीच्या कामाची माहिती, कंपनीचं वार्षिक उत्पन्न, बँकेत किती खाती आहेत, एकूण किती संपत्ती आहे, भावाचा व्यवसाय, पासपोर्टची माहिती यांसारखे प्रश्न विचारले जातील. सुशांतवरचेही विचारले जातील प्रश्न तर तिसऱ्या भागात रियाला सुशांतशी निगडीत प्रश्न विचारले जातील. असं म्हटलं जातं की यात रियाचं सुशांतसोबतचं नातं, सुशांतचं कुटुंब, सुशांतसोबतचा व्यवसाय यांसारखे प्रश्न विचारले जातील. सुशांतच्या चार्टर्ड अकाउंटन्टचीही झाली चौकशी ईडीने या प्रकरणी मनी लॉण्ड्रिंगची केस दाखल केली होती. सुशांतचा सीए संदीप श्रीधरचीही यासाठी चौकशी करण्यात आली होती. यावेळी टीमने श्रीधर यांना 'दिल बेचारा' सिनेमात अभिनेत्याचा लागलेला पैसा, बँक डिटेल्स आणि इनकम टॅक्स रिटर्न्सबद्दल प्रश्न विचारले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EMUTkL