मुंबई: बॉलिवूड अभिनेता मृत्यू प्रकरणात त्याची मैत्रीण आणि तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना सीबीआयकडून समन्स बजावण्याची शक्यता आहे. सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केला असून, रिया आणि तिचे कुटुंबीय हे मुख्य आरोपी आहेत. सीबीआयचे पथक रिया आणि तिच्या वडिलांची चौकशी करू शकतं. रिपोर्टनुसार, रियाच्या चौकशीसाठी सीबीआयने प्रश्नांची मोठी यादीच तयार केली असल्याचे समजते. सुशांतचा मृत्यू आणि त्याच्या आरोग्याविषयीची अनेक उत्तरे यातून मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिपोर्टनुसार, रियाची चौकशी अनेक दिवस केली जाण्याची शक्यता आहे. कारण एफआयआरमध्ये रिया ही मुख्य आरोपी आहे. तसेच तिला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा अवाकाही मोठा आहे. पहिल्या टप्प्यात रियाला २४ प्रश्न विचारण्याची यशक्यता आहे. सुशांतसिंह राजपूत आणि तुझ्यामध्ये असे काय झाले की, ८ जून रोजी तू त्याच्या घरातून निघून गेली? सुशांत कोणत्या गोष्टीमुळे तणावात होता? तसं असेल तर ती कोणती? सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच १४ जून रोजी तू कुठे आणि काय करत होती? सुशांत कोणती औषधं घेत होता? तू त्याला काही औषधांबाबत सांगितलं होतं का? तू सुशांतची भेट एखाद्या डॉक्टरशी घडवून आणली होती का? सुशांत रुग्णालयात दाखल का झाला होता? सुशांतची प्रकृती बिघडल्याचे तू सुशांतच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं का? तू सुशांतसोबत एखादा चित्रपट करणार होती का? तुझ्या वडिलांनी सुशांतला औषध घेण्यास सांगितलं होतं का? सुशांतच्या पैशांच्या व्यवहारासंबंधीचे निर्णय तू घेत होती? सुशांतसोबतचं तुझं नातं कसं होतं ? सुशांतच्या मृत्यूनंतर तू त्याच्या कुटुंबीयांना फोन केला होता? सुशांतच्या मृत्यूनंतर तू त्याच्या घरी गेली होती का? कूपर रुग्णालयातील शवागारात का गेली होती? मुंबई पोलिसांनी तुझी किती वेळा चौकशी केली? तू सुशांतसोबत भागिदारीत एक नवी कंपनी का सुरू केली? लॉकडाऊनच्या काळात तुझ्या घरी कोण-कोण भेटायला आला होता? सुशांतच्या बहिणीसोबत तुझा वाद आहे का? तू सुशांत आणि तुझ्या नात्याबाबत कुणाकुणाला सांगितलं होतं? तू डीसीपींना (वांद्रे) फोन का केला होता? सुशांतचा मृत्यू कशामुळे झाला? तुला काय वाटतं? तुझी आणि सिद्धार्थ पिठानीची भेट कधी झाली? तू सुशांतच्या घरातील कर्मचाऱ्याला कामावरून का काढले? तू पिठानी आणि सॅम्युअल मिरांडाच्या संपर्कात आहेस?
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j26Qls