मुंबईः 'डोंबिवली फास्ट', 'लय भारी', 'दृष्यम' यासारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कामत यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( has been admitted to a hospital) निशिकांत गेल्या अनेक दिवसांपासून यकृतासंबंधित आजारानं त्रस्त होते. निशिकांत यांना गेल्या १० दिवसांपासून अधिक त्रास जाणवू लागला होता. मात्र, त्याची प्रकृती स्थिर होती. मात्र, आज अचानक त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. डोंबिवली फास्ट या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या निशिकांत यांनी कमी वेळातच हिंदी सिनेसृष्टीत आपला जम बसवला आहे. दृश्यम, मुंबई मेरी जान, मदारी, फोर्स हे त्यांचे सिनेमे हिट ठरले आहेत. मराठीतही त्यांनी अनेक सिनेमांचे दिग्दर्शन केलं आहे. डोंबिवली फास्ट, लय भारी, फुगे, हे त्यांचे सिनेमे विशेष गाजले आहेत. दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अभिनयातही आपणी चुणूक दाखवली आहे. सातच्या आत घरात, रॉकी हॅण्डसम, जुली-२, भावेश जोशी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XTY8hc