मुंबई- प्रकरणात अनेक चॅट्स समोर येत आहेत. नुकतेच आता आणखीन काही चॅट समोर आले आहेत. यात सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीच्या वकिलांनी हे चॅट शेअर केले आहेत. यातून वकिलांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की सुशांतची बहीण नीतूला (सर्वात मोठी बहीण राणी) सुशांतच्या आजाराबद्दल आधीपासून माहीत होते. श्रुती मोदींशी केले होते चॅट श्रुती मोदीचे वकील अशोक सरवगी यांनी हे स्क्रीनशॉट्स शेअर केले. नोव्हेंबर २०१९ मध्ये सुशांतची बहीण आणि श्रुती यांच्यात सुशआंतच्या आजारासंदर्भात संभाषण झालं होतं. प्रिस्क्रिप्शन ११ नोव्हेंबरचं असून श्रुतीने २६ नोव्हेंबरला ते नीतूला पाठवलं होतं. यात नीतू असंही म्हणाली होती की तिला अशा डॉक्टरांना भेटायचं आहे जे घरी येऊ शकतील. तसंच डॉक्टर कोणत्या वेळेत येऊ शकतील हे देखील तिने विचारलं होतं. यानंतर श्रुतीने तिला मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांचा नंबर पाठवला होता. रियाने सांगितलं २०१३ मध्ये सुशांत डॉक्टरांना भेटायला होता रिया चक्रवर्तीने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की सुशांत २०१३ मध्ये एका मानसोपचार तज्ज्ञाला भेटला होता. यानंतर अंकिता लोखंडेने यावर आपली प्रतिक्रिया देताना इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने स्पष्ट लिहिलं होतं की, सुरुवातीपासून ते २०१६ पर्यंत ती सुशांतसोबत होती. तेव्हा सुशांत मानसोपचार तज्ज्ञाला कधीच भेटला नाही. अंकिता म्हणाली नैराश्यात नव्हता सुशांत अंकिता म्हणाली- सुशांत निराश होऊ शकत नाही सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या फ्लॅटमेटने सांगितले होते की तो नैराश्यात होता. पण सुशांतच्या कुटुंबियांच्या मते त्यांना सुशांतच्या आजाराबद्दल काही माहीत नव्हतं. तसेच सुशांतच्या एक्स- गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या मतेही सुशांत डिप्रेशनमध्ये जाऊ शकत नसल्याचं ती म्हणाली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gJnMM6