मुंबई- अभिनेता केसची चौकशी जसजशी पुढे जात आहे, या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. फक्त सुशांतचाच मृत्यू नाही तर दिशाच्या मृत्यूवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवसआधी दिशाने आत्महत्या केल्याचं म्हटलं गेलं होतं. पोलिसांनीही सुरुवातीच्या तपासात दिशाने आत्महत्या केली असंच म्हटलं. पण आता दिशाच्या मृत्यूचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला जात आहे. सद्य परिस्थितीत दिशाच्या कुटुंबियांना अतीव दुःख होत आहे. आता त्यांनी या प्रकरणी आपलं मौन सोडलं असून दिशाला बदनाम करण्याचा प्रयत्न सोशल मीडिया करत असल्याचं सांगितलं. दिशा सालियनच्या आई- वडिलांनी सोडले मौन- एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं की, 'कृपा करून आमच्या मुलीची प्रतिमा मलीन करू नका. या सगळ्या गोष्टींचा गैरफायदा कोणी घेऊ नये. आमची ती एकुलती एक मुलगी होती. आम्ही आमची मुलगी गमावली. आता तिच्या मृत्यूनंतर तिचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते आता आम्हाला त्रास देऊन मारू इच्छितात.' सुशांतच्या आत्महत्येच्या एक आठवड्याआधी दिशाचा ९ जून रोजी मृत्यू झाला होता. ती २८ वर्षांची होती. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर अनेक प्रकारे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 'ते आम्हाला त्रास देऊन मारतील' हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं की, ' मी भारतियांना विनंती करेन की कृपया करून मीडिया, सोशल मीडिया, यूट्यूब अशा सर्व ठिकाणी जे काही सांगितलं जात आहे ते सर्व चुकीचं आहे. समोर येत असलेल्या सर्व गोष्टी खोट्या आणि फक्त अफवा आहेत. आम्ही आमची एकुलती एक मुलगी गमावली आता सोशल मीडियावरील गोष्टी आमचा जीव घेतील. त्यामुळे मी सर्वांना आणि सर्वोच्च न्यायालयाला विनंती करते की या सर्व गोष्टी त्वरीत थांबवा. आता आमच्यात मुलीबद्दलच्या वाईट गोष्टी ऐकण्याची ताकद उरली नाही.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3adsTlZ