Full Width(True/False)

रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेलमध्ये होतं आमिर खानचं नाव

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल तपासण्यात आले. यात आता आमिर खानचंही नाव समोर आलं आहे. सध्या रिया आणि तिच्या कुटुंबियांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी होत आहे. रियाचे कॉल डिटेल तपासले जात आहेत. यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे. यात आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर, राणा डग्गुबती या कलाकारांच्या नावाचाही समावेश आहे. सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी एफआयआर दाखल केल्यानंतर रिया आणि तिच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली. सीडीआर लिस्टमध्ये आमिर खानचंही नाव आता रियाच्या कॉल डिटेलमध्ये आमिर खानचंही नाव आलं आहे. रिपोर्टनुसार रियाने एकदाच आमिर खानला फोन केला होता. त्या फोनचं उत्तर म्हणून आमिरने तीन टेक्स मेसेज केले होते. आयएएनएसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक बॉलिवूड कलाकारांच्या नावाप्रमाणे या यादीत आमिर खानचंही नाव आहे. दोघांनी एकमेकांना केले दोन एसएमएस सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूवर आमिर, सलमान आणि शाहरुख या तीनही खानने अजूनपर्यंत आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान रियाने ३० कॉल रकुल प्रीतला केले होते. तर रकुलनेही तिला १४ कॉल केले होते. दोघींनी एकमेकींना दोन एसएमएसही केले होते. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरशी बोलली रिया सीडीआर रिपोर्टनुसार, रियाने 'आशिकी २' अभिनेता आदित्य रॉय कपूरशी अनेक वेळा संवाद साधला होता आणि तिने अभिनेत्याला १६ वेळा फोन केला होता आणि त्याने प्रतिसादात सातवेळा कॉल केले होते. याशिवाय तिने श्रद्धा कपूरला तीन वेळा फोन केला आणि श्रद्धाने तिला दोन वेळा फोन केले होते. राणा दग्गुबतीलाही फोन केला या सर्वांव्यतिरिक्त रियाने 'बाहुबली' फेम अभिनेता राणा दग्गुबतीला सात वेळा कॉल केले होते आणि त्या बदल्यात अभिनेत्याने तिला चार वेळा फोन केला होता. रियाने सरोज खान यांनाही केले होते कॉल सरोज खान आता आपल्यात नाही. रियाच्या कॉल डिटेलमध्ये त्यांचंही नाव आहे. रियाने सरोज यांना पाचवेळा कॉल केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33ZaIPO