मुंबई :प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तींचं विसर्जन तलावात, नदीत किंवा समुद्राच्या पाण्यात केल्यामुळे होणारं जलप्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. अनेकांनी त्यावर उपाय म्हणून पंचधातूची गणेशमूर्ती घडवून घ्यायला सुरुवात केली आहे. अभिनेता आणि त्याच्या कुटुंबियांनी आठ वर्षांपूर्वीच हा निर्णय घेतला होता. पर्यावरणरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत चांगला असा हा निर्णय घेऊन, पर्यावरणाची अधिकाधिक काळजी घेत उत्सव साजरा करावा, असं आवाहन स्वप्निलनं केलं आहे. तो म्हणतो, 'आमच्या घरी दीड दिवस गणपती असतो. यंदा मी घरच्याघरी अगदी साधेपणानं गणेशाची पूजा करणार आहे. गणेशोत्सवामध्ये सर्वांच्या गाठीभेटी होतात, आनंदाचं वातावरण असतं. पंचधातूची गणेशमूर्तीची पूजा करण्याचं आमचं हे आठवं वर्ष आहे. पर्यावरणाला धोका पोहोचू नये म्हणून आम्ही त्याच गणेशमूर्तीची पूजा दरवर्षी करतो. गॅलरीमध्ये एका बादलीत गणेशमूर्तीचं विसर्जन करतो. नंतर साधारण अर्ध्या तासानं ती मूर्ती बाहेर काढून, स्वच्छ करून पुढच्या वर्षीसाठी कपाटात ठेवून देतो. यावर्षी दर्शनासाठी कुणालाही घरी येता येणार नाही. म्हणून मी गणपती बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणार आहे. म्हणजे सगळ्यांना घरबसल्या दर्शन घेता येईल.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34jWPfv