Full Width(True/False)

सुशांतच्या वडिलांकडेच त्याचा फोन नंबर नसायचा; अंकिताकडून खुलासा

मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येनंतर त्याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतच्या वडिलांची त्याची गर्लफ्रेंड हिच्यावर गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. यानंतर या प्रकणाला वेगळं वळण आलं असून सुशांतची एक्स गर्लफ्रेंड देखील या सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण सर्वांसमोर यावं यासाठी पुढं आली आहे. अनेक वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीतल तिनं सुशांतच्या आयुष्यासंदर्भात अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. गेल्यावर्षभरापासून सुशांत त्याच्या कुटुंबियांपासून दूरराहत होता. त्यांच्या जास्त संपर्कात येत नव्हता. त्यामुळं त्याचे कुटुंबिय देखील काळजीत होते. पूर्वी सारखं तो त्याच्या बहिणींसोबतही बोलत नव्हता, असं अंकिता म्हणाली. इतकंच नाही तर तो सतत त्याचे फोन नंबर बदलत होता. सुशांतच्या वडिलांकडे देखील त्याचा फोन नंबर नसायचा. ते मला फोन करून त्याचा फोन नंबर मागायचे, असंही अंकितानं मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. मी देखील ब्रेकअप झाल्यांतर त्याच्या संपर्कात नव्हते, त्यामुळं मलाही त्याच्याफोन नंबर माहित नव्हता, असं अंकितानं स्पष्ट केलं. सुशांतच्या स्वभात झालेल्या बदल त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात आला होता. त्याची तब्येत बरी नव्हती तेव्हा त्याची मोठी बहिण त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आली होती. मात्र, सुशांतनं त्यांना घरी येणार नाही असं सांगत त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. घरच्यांपासून तो दुरावला होता, असा खुलासा अंकितानं केला. महेश शेट्टीनंही केला खुलासा सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये विरोधत केलेल्या आरोपांनाही महेशनं दुजोरा दिला आहे. रिया आणि तिची आई सुशांतच्या आयुष्यातील प्रत्येकगोष्टीत हस्तक्षेप करायची असं महेशनं म्हटलं आहे. रिया आणि तिच्या आईनं सुशांतच्या घरातील सर्व कर्मचारी बदलले होते. सुशांतला त्याच्या घरच्यांसोबत बोलण्यातही दोघींनी बंधनं असायची. मित्र किंवा घरच्यांच्यासोबत बोलल्या नंतर सुशांत त्याचा फोन रिसेट करायचा असं महशे शेट्टीनं बिहार पोलिसांना सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी रियानं त्याच्या बॉडिगार्डला देखील कामावरून काढून टाकलं होतं.सुशांत आणि महेश यांचं शेवटचं बोलणं हे आत्महत्येच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच १३ जून रोजी झाल्याचंही महेशनं पोलिसांना सांगितलं. तसंच सुशांतला कुर्ग इथं महेशसोबत ऑरगॅनिक शेत करण्याची इच्छा होती. परंतु रियानं त्याला विरोध केला होता.असंही महेशनं सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30hs0W5