Full Width(True/False)

SSR Death case: रिया चक्रवर्तीला संध्याकाळी अटक होण्याची शक्यता

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं ( ) रिया चक्रवर्तीला समन्स पाठवल्यानंतर आज तिची चौकशी सुरू आहे. काही वेळापूर्वी रिया मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाली असून सुशांतची केस मनी लॉण्ड्रिंगशी जोडली गेली असल्यामुळे ईडीने रियाला विचारण्यासाठी प्रश्नांची एक यादीच तयार केली आहे. पाहूयात या आज दिवसभर काय घडामोडी होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. - रियाची तीन भागांमध्ये चौकशी करण्यात येणार आहे. -ईडीने रियाला विचारण्यासाठी प्रश्नांची एक यादीच तयार केली आहे. -रियाची आज दिवसभर चौकशी होणार. कदाचित संध्याकाळी अटकेची शक्यता. सुशांतच्या खात्यातील १५ कोटी रुपये, तीन कँपन्यांमधील व्यवहार आणि काही बनावट खाते आहेत का, याचा तपास होणार : ईडी च्या सूत्रांची माहिती -रिया चक्रवर्ती इडीच्या कार्यालयात पोहोचली.. -‘जबाब पुढे ढकलण्याची रियाची विनंती अमान्य केली असल्याचे इडीने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करणारी जबाबदार नागरिक म्हणून रिया इडीसमोर दिलेल्या वेळेत जबाब नोंदवण्यासाठी हजर झाली आहे..’ रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी दिली माहिती.. अभिनेता आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री आज सक्तवसुली संचालनालयासमोर (इडी) चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असल्याने ती होईपर्यंत माझा जबाब नोंदवणे पुढे ढकलावे, अशी विनंती रियाने ईडीला केली आहे. रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी दिली माहिती. -सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू असल्याने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या दोन जनहित याचिकांवर कोणताही अंतरिम आदेश देण्याास उच्च न्यायालयाने नकार दिला. -'मुंबई पोलिसांकडून तपास लांबवला जात आहे आणि राजकारणी व सिनेसृष्टीतील लोकांच्या दबावाखाली पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत’, असा आरोप करत दोन्ही याचिकांत सीबीआय किंवा एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आहे..


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XDPenJ