Full Width(True/False)

हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितलं, संजय दत्तला स्टेज ३ नाही तर स्टेज ४ चा आहे कॅन्सर

मुंबई- गेल्या आठवड्यात संजय दत्तला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याला इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. त्याला करोना चाचणीसाठी लीलावती इस्पितळात नेण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. पण त्यानंतर इतर चाचण्या केल्या असता त्याला असल्याचं स्पष्ट झालं. संजय दत्तने यानंतर स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत तो उपचारांसाठी कामांमधून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं. सुरुवातीला त्याला स्टेज 3 झाल्याचे सांगण्यात आले होते पण इस्पितळातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय दत्तचा फुफ्फुसाचा कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचला आहे. ऑक्सिजनची पातळी होती कमी- शनिवारी ८ ऑगस्टला संजयला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यानंतर त्याने डॉक्टरांना कळवले. त्याला करोनाची लागण झाल्याचं सुरुवातीला वाटत होतं. घरात असणाऱ्या ऑक्सीमीटरवर त्याने शरीरातील ऑक्सिजन तपासून पाहिला. तेव्हा त्याच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी दिसलं. यानंतर संजयला तातडीने लीलावती इस्पितळात बोलावण्यात आलं. इस्पितळात पाहण्यात आलं की, त्याच्या उजव्या फुफ्फुसातून श्वास येत नाहीये. सीटी स्कॅन केले असता कळलं की त्याच्या उजव्या फुफ्फुसात काही द्रव जमा झालं आहे आणि दोन्ही फुफ्फुसात जखमाही झाल्या आहेत. संजू विचारात राहिला प्रश्न संजयला सांगण्यात आलं की त्याला इन्फेक्शन झालं असू शकतं, टीबी असू शतो, जास्त व्यायाम केल्यामुळे दुखापत झालेली असू शकते किंवा कर्करोग असू शकतो. त्याच्या फुफ्फुसातलं पाणी काढण्यात आलं. जवळपास दीड लीटर पाणी काढण्यात आलं. यानंतर जवळपास दोन दिवस तो इस्पितळातच होता. जेव्हा संजूला सांगण्यात आलं की जे पाणी काढलं आहे ते तपासासाठी पाठवण्यात आलं आहे तेव्हा त्याने अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. मान्यताने शेअर केलं होतं स्टेटमेन्ट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आलेल्या रिपोर्टमध्ये हे निश्चित झाले आहे की संजय दत्तला चौथ्या टप्प्यातला फुफ्फुसाचा कर्करोग आहे. यानंतर बुधवारीच मान्यता दत्तने स्टेटमेन्ट शेअर करत म्हटलं की, संजू लढाऊ आहे. तो लवकर बरा होईल आणि या काळात पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Fd87HI