Full Width(True/False)

जिओची जबरदस्त ऑफर, १४१ रुपयात घेऊन जा JioPhone 2

नवी दिल्लीः देशाची सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ()आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड प्लान घेऊन येते. आता कंपनीने आपल्या फीचर फोन ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहक १४१ रुपयांच्या प्रति महिना किंमतीवर रिलायन्स जिओचा फीचर फोन खरेदी करु शकतात. ही एक ईएमआय स्कीम आहे. याची सविस्तर माहिती कंपनीच्या वेबसाइटवर दिली आहे. वाचाः काय आहे ऑफर जिओफोन २ फीचर फोनची खरी किंमत २९९९ रुपये आहे. परंतु, ईएमआय ऑफर अंतर्गत या फोनला १४१ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. वेबसाइटच्या माहितीनुसार, ही ऑफर केवळ क्रेडिट कार्ड युजर्संसाठी देण्यात आली आहे. ग्राहक या फोनला कंपनीच्या अधिकृत वेबसाईट Jio.com वरून खरेदी करु शकतात. फोन खरेदीसाठी आपला पिनकोड टाकून फोनची उपलब्ध माहिती जाणून घेऊ शकता. या फोनचा डिलिव्हरी चार्ज ९९ रुपये आहे. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये हा एक ४जी फीचर फोन आहे. ज्यात HD वॉइस कॉलिंग, फास्ट 4जी स्पीड, इंटरटेनमेंट अॅप्सचा सपोर्ट दिला आहे. या ड्यूल सिम फोन मध्ये 2.4 इंचाचा QVGA TFT डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 2000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १५ दिवसांचा स्टँडबाय टाइम देते. म्यूझिक आणि व्हिडिओसाठी यात १२८ जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्ड टाकता येवू शकतो. यात qwerty कीपॅड, 3.5mm हेडफोन जॅक, एफएम रेडियो आणि टॉर्च लाइट दिली आहे. वाचाः कॅमेऱ्याचा फीचर फोन फोनमध्ये फोटोग्राफीसाठी कॅमेरा दिला आहे. यात रियर मध्ये २ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि फ्रंटला ०.३ मेगापिक्सलचा VGA फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५१२ एमबीची रॅम आणि ४ जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली आहे. या फोनमध्ये २४ भाषेचा सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PS2fFO