Full Width(True/False)

केअर बोर्ड शेअर करत अभिषेक म्हणाला, 'मी करू शकतो'

मुंबई- करोना व्हायरसमधून लवकर बरा होण्याचे आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे. सध्या तो नानावटी इस्पितळात करोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान तो चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हेल्थ अपडेट देत असतो. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. यात त्याने इस्पितळातील व्हाइट बोर्ड दाखवला आहे. यात त्याचं डाएट प्लॅन, नर्सचं नाव आणि डिस्चार्ज प्लॅनबद्दल लिहिण्यात आलं आहे. लिहिलं- कम ऑन बच्चन अभिषेकने इस्पितळातील केअर बोर्डचा फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'इस्पितळातील दिवस- २६, डिस्चार्ज प्लॅन- नाही. कम ऑन बच्चन तू हे करू शकतोस.' पोस्ट करत आहे इस्पितळातून फोटो अभिषेकने याआधी इस्पितळातून निसर्ग सौंदर्याचा एक फोटो शेअर केला. अभिषेकचे वडील अमिताभ बच्चन, पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या तिघांनाही इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला असून आता अभिषेकला डिस्चार्ज मिळण्याची सर्व बच्चन कुटुंबियं वाट पाहत आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी मुलाचं मनोबळ वाढवण्यासाठी एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी एक कविता शेअर केली. "धनुष उठा, प्रहार कर, तू सबसे पहला वार कर, अग्नि सी धधक-धधक हिरन सी सजग सजग सिंह सी दहड़ कर, शंख सी पुकार कर, रुके न तू, थके न तू, झुके न तू, थमे न तू." ११ जुलैला अमिताभ आणि अभिषेक दोघंही करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्याचदिवशी तातडीने त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्या आणि आराध्यालाही करोनाची लागण झाली होती. सुरुवातीला ऐश्वर्या आणि आराध्याला घरीच क्वारन्टीन करण्यात आलं होतं. मात्र १७ जुलै रोजी ऐश्वर्याला ताप आल्यामुळे अखेर त्यांनाही इस्पितळात भरती करण्यात आलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33vHKXG