Full Width(True/False)

ईडीच्या चौकशीत रियाने लपवला स्वतःचा अजून एक फोन नंबर

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जात आहे, तसे दररोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. शुक्रवारी ईडूने रिया चक्रवर्तीची आठ तासांहून जास्त चौकशी केली होती. यावेळी रियाने ईडीला तिच्याकडे असणाऱ्या दुसऱ्या फोन नंबरची माहिती लपवल्याचं समोर आलं. रियाची आज सोमवारी पुन्हा एकदा चौकशी करत असून तिला मालमत्ते संदर्भात पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ईडीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचीही १८ तास चौकशी केली होती. झूमने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रियाच्या भावाची शौविकची ईडीने १८ तासांहून जास्त काळ चौकशी केली. रविवारी सकाळी ६.३० वाजता तो ईडीच्या ऑफिसमधून बाहेर पडला. आता रियाच्या वडिलांना इंद्रजीत चक्रवर्ती यांनाही ईडीचा समन्स पाठवण्यात आला आहे. दरम्यान, ईडीने रियाला विचारलेल्या प्रश्नांची माहिती समोर आली आहे. रियाला तिचे सर्व इलेक्ट्रॉनिक गोष्टी जमा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र यावेळी तिने स्वतःच्या दुसऱ्या फोन नंबरची माहिती दिली नाही. विशेष म्हणजे रिया तो दुसरा नंबरही नियमितपणे वापरते. आता ईडी रियाचा हिडन डेटा डाउनलोड करण्याच्या तयारीत आहे. सुशांतच्या अकाउंटची चौकशी करताना ईडीने रिया आणि शौविकला यासंबंधीचे प्रश्न विचारण्यात आले होते. आज पुन्हा एकदा ईडी रियाची चौकशी करणार आहे. रिपोर्टनुसार, सोमवारी रियासोबत तिच्या वडिलांचीही ईडी सोमवारी चौकशी करणार आहे. याशिवाय सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीलाही पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयनेही , इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅमुअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gEkACa