Full Width(True/False)

‘सुशांतची केस आता बिहार विरुद्ध महाराष्ट्रच झाली’

नवी दिल्ली- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याची चौकशी मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने केली जात आहे. पण आता या चौकशीत बिहार विरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि पोलीस दल अशी स्थिती दिसत आहे. केंद्रीय मंत्री आरके सिंह यांनी सुशांत राजपूतच्या केसची सीबीआय चौकशी व्हावी असं मत स्पष्ट केलं आहे. यासोबतच उद्धव सरकार असं करू देत नसल्याचंही ते म्हणाले. याआधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही स्पष्ट केलं होतं की, राजपूत कुटुंबियांनी जर सीबीआय चौकशीची मागणी केली तर यावर विचार केला जाऊ शकतो. केंद्रीय मंत्री आरके सिंह म्हणाले की, ‘ही केस सीबीआयकडे द्यावी अशी मागणी सातत्याने होत आहे. मी स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना यासंबंधी सांगितले पण त्यांनी नकार दिला. न्यायासाठी सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे. सुशांतच्या कुटुंबियांनाही हेच हवंय.’ मंत्री आरके सिंह यांनी यावेळी मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलीस काहीही करत नाहीये. फक्त नावासाठी लोकांच्या चौकशी करत आहे. त्यांनी (मुंबई पोलीस) एफआयआरही दाखल करून घेतली नाही. तसंच कोणाकोणाची चौकशी केली याबद्दलही सांगितले नाही. आता या प्रकरणी पटणामध्ये केस फाइल झाली आहे. याआधी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचीही प्रतिक्रिया आली होती. सुशांतचे वडील त्यांना वाटले तर ते सीबीआय चौकशीची मागणी करू शकतात. पण आम्ही अशी मागणी करत नाही. आम्ही ही केस सोडवण्यात सक्षम आहोत. सध्या बिहारची टीम मुंबईत असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना महत्त्वपूर्ण कागदपत्र सादर केले जातील. बॉलिवूड माफियांच्या दबावात उद्धव ठाकरे- सुशील मोदी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनीही सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. सुशीलकुमार म्हणाले की, सुशांतला न्याय देण्यासाठी राज्यसरकार कोणत्याही संकटांचा सामना करेल. यासोबतच उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली आहेत. याचमुळे सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी ते सर्व गोष्टी लपवू इच्छितात. काँग्रेस बिहारच्या लोकांना काय तोंड दाखवणार?


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Pwkfpr