मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ईडीने रिया चक्रवर्तीशी केलेल्या चौकशीत अनेक खुलासे होत आहेत. या सर्वाची सुरुवात सुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची हेराफेरी केल्यापासून झाली. सुशांतच्या सीएनेही काही रक्कम घेतला असल्याचा आता संशय व्यक्त केला जात आहे. सुशांतच्या कंपनीचं अकाउंट सांभाळणाऱ्या दोन सीएच्या अकाउंटमध्ये मार्चमध्ये काही रक्कम गेल्याचं खुलासा रियाने ईडीच्या टीमकडे केला. २ कोटी ६५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने त्याच्या मोठ्या बहिणीच्या नावे साडेचार कोटी रुपयांची केली होती. मात्र सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर रिया तिचा भाऊ शौविक आणि दोन सीएच्या मदतीने त्या एफडीमधले जवळपास अडीच कोटी रुपये काढले. यानंतर एफडी फक्त २ कोटींचेच राहिले. याशिवाय सुशांतच्या कंपन्यांच्या पैशांच्या बँक खात्यांमध्येही ईडीला हेराफेरी केल्याचं दिसलं. याबाबतीत रियाला प्रश्न विचारले असता तिने अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तरं दिली नाहीत. सुशांतच्या वडिलांनी रियावर केले होते हेराफेरीचे आरोप याआधी सुशांतच्या वडिलांनी यांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल करताना मुलाच्या पैशांवर रियाचा डोळा असल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या बँक अकाउंटमध्ये १७ कोटी रुपये होते. मात्र वर्षभरात त्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. ज्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर झाले त्यांचा आणि सुशांतचा काहीही व्यवहारीक संबंध नव्हता. दरम्यान, केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होत आहे. ईडीने सुशांतच्या बँक अकाउंटच्या चौकशीत शुक्रवारी रियाची आठ तासांहून अधिक तास चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत रियाने अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने उत्तरं न दिल्यामुळे तिला पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. शुक्रवारी रियाच्या चौकशीनंतर शनिवारी तिच्या भावाची शौविकची १८ तास चौकशी करण्यात आली.आता सोमवारी पुन्हा एकदा रियाची चौकशी करण्यात येणार आहे. असं म्हटलं जातंय की यावेळीही रियाला तिची मालमत्ता आणि मिळकतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात येतील.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ktp2Gk