नवी दिल्लीः चायनीज कंपन्यांच्या स्मार्टफोन्सची कमी किंमत आणि जबरदस्त वैशिष्ट्ये यामुळे ते अनेक देशात प्रसिद्ध आहे. भारतात या फोनचे खूप मोठे मार्केट आहे. शाओमी आणि रियलमी यासारखे ब्रँड्स बजेट रेंजमध्ये सर्वात जास्त पसंत केले जाते. एका नवीन रिपोर्टमधून चायनीज स्मार्टफोन युजर्सची चिंता वाढवू शकते. समोर आलेल्या एका चायनीज ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये कंपनी मेलवेयर प्री इन्स्टॉल करीत होती. तसेच याच्या मदतीने युजर्संचा डेटा आणि पैसे चोरीत होती. वाचाः चायनीज ब्रँडच्या Tecno W2 स्मार्टफोन मध्ये दोन मेलवेयर xHelper आणि Triada मिळाले आहेत. याच्या मदतीने युजरला न विचारता त्यांच्या डिव्हाईसमध्ये अॅप डाऊनलोड आणि इन्स्टॉल केले जावू शकत होते. तसेच पेड सर्विसचे सब्सक्रिप्शन केले जावू शकत होते. या स्मार्टफोनच्या एका युजरला माहिती पडले की, त्याचा खूप सारा डेटा खर्च केला जात होता. यावरून एका सर्विससेजचा मेसेज आला. तर युजरने त्या सर्विससाठी साइन अप केले नाही. वाचाः कंपनीने मानली चूक Tecno W2 फोन मध्ये Triada आणि xHelper मेलवेयर असल्याचे स्पष्ट झाले आहे. Buzzfeed च्या रिपोर्टनुसार, कंपनीने सप्लाय चेनच्या वेंडर ला यासाठी जबाबदार ठरवले आहे. कंपनीने म्हटले आहे की, मेलवेयरमधून काही प्रॉफिट होत नाही. किती स्मार्टफोन्स मेलवेयरमुळे फटका बसला आहे. यासंबंधी डिटेल्स कंपनीने शेयर करण्यात आली नाही. वाचाः या ब्रँडमध्येही मेलवेयर Secure-D च्या माहितीनुसार यात सिक्योरिटी सिस्टमने 844,000 फ्रॉड ट्रान्झक्शन ब्लॉक केले आहे. हे ट्रान्झक्शन गेल्या वर्षी मार्च ते डिसेंबर दरम्यान स्वस्त स्मार्टफोन्समध्ये इन्स्टॉल मेलवेयरची मदत करीत होते. सिक्योरिटी फर्मने म्हटले की, TCL टेक्नोलॉजी च्या Alcatel फोन्समध्ये मेलवेयर प्री-इंन्स्टॉल मिळाले आहेत. परंतु, ही कंपनी भारतात फोन बनवन नाही. ब्राझील आणि म्यानमार मध्ये प्रसिद्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32qQKLt