Full Width(True/False)

सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर साइन करणाऱ्या डॉक्टरांना मिळत आहेत शिव्या

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कूपर इस्पितळातील पाच डॉक्टरांना शिविगाळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या पाच डॉक्टरांनी सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर सह्या केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी अटोप्सीचा अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तो अहवाल देणाऱ्या डॉक्टरांची नावं आणि फोन नंबर नमूद केले होते. सुशांतने आत्महत्या केली असं लिहून देण्यासाठी डॉक्टरांनी लाच घेतली असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. अगदी थोड्याच वेळात त्यातील एका डॉक्टरांचे फेसबुक प्रोफाइलचे स्क्रीनशॉट तर दुसऱ्या डॉक्टरांचे लिंक्डइन प्रोफाइलचे स्क्रीनशॉट व्हायरल केले जाऊ लागले. हे कमी की काय अनेकांनी त्यांना थेट फोन करून शिविगाळ करायला सुरुवात केली. रूग्ण म्हणून डॉक्टरांना केले फोन काही अज्ञात व्यक्तींनी डॉक्टरांच्या दुसऱ्या फोन नंबरवर आणि इस्पितळातील लँडलाइन फोनवरही कॉल केले. त्यांच्याशी बोलल्यानंतर अनेकांनी ते रेकॉर्डिंग सोशल मीडियावर शेअर केलं. यात डॉक्टरांना त्रास दिल्याचे स्पष्ट ऐकू येते. परवाना रद्द करण्याची मागणी डॉक्टरांचे परवाने रद्द करण्यापासून ते अटक, खुनापर्यंत आणि इस्पितळ बंद करण्यापर्यंत सगळ्या धमक्या देण्यात आल्या. निनावी फोन करणाऱ्यांनी त्या डॉक्टरांचे सर्व संपर्क क्रमांक आणि वर्क प्रोफाइल सोशल मीडियावर शेअर केली. अधिक माहिती देण्यास नकार कूपर इस्पितळाचे डीन डॉ. पिनाकिन गुर्जर यांनी बातमीला दुजोरा देत स्पष्ट केलं की, ऑनलाइन आणि फोनवरून डॉक्टरांना त्रास दिला जात आहे. परंतु गुर्जर यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. भीतीमुळे तक्रार करत नाही या पाच डॉक्टरांच्या एका सहकाऱ्याने सांगितलं की, इण्टरनेटवर खोटा दावा करण्यात आला आणि त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. या सर्व गोष्टींमुळे डॉक्टरांना सुरक्षित ठिकाणी लपवावे लागले. त्याचबरोबर हॉस्पिटल अधिकाऱ्यांनी सांगितले की डॉक्टर भीतीमुळे पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. पोलिसांत तक्रार केल्याने त्रास वाढू शकतो असं त्यांना वाटत आहे. सुशांतच्या अहवालावर कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले पोस्टमॉर्टम अहवालात कूपर रुग्णालयाने सुशांतचा मृत्यू लटकल्यामुळे श्वास घुसमटून झाल्याचे सांगितले होते. यावर अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, अटोप्सी रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ लिहिली जाते. पण सुशांतच्या रिपोर्टमध्ये असे कुठेही लिहिले नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l4xAUb