Full Width(True/False)

अजून एका आर्टिस्टचं निधन, बाथटबमध्ये मिळाला शव

मुंबई- प्रसिद्ध आर्टिस्ट यांचं निधन झालं आहे. ४१ वर्षांचे राम इंद्रनील यांचा मृतदेह माटुंगा येथील त्यांचया घरी बाथटबमध्ये मिळाला. पोलिसांनी त्यांच्या मृत्यूला अपघाती मृत्यू सांगत गुन्हा नोंदवून घेतला आहे. पण राम इंद्रनील यांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांचं मत आहे. माटुंगामध्ये कामत त्यांच्या आईसोबत रहायचे. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सुसाईड नोटमध्ये राम इंद्रनील कामत यांनी आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरले नाही. सध्या पोलास कामत यांच्या कुटुंबिय आणि जवळच्या नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार राम इंद्रनील कामत यांचा मृतदेह बुधवारी ३ वाजता बाथटबमध्ये सापडला. त्यानंतर त्यांना तातडीने इस्पितळात नेण्यात आले होते. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कामत यांचा पोस्टमॉर्टमचा अहवाल येणे बाकी आहे. राम इंद्रनील कामत गेल्या काही दिवसांपासून मानसिक ताणात होते. त्यातच करोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. राम इंद्रनील कामत आर्टिस्टसह उत्तम छायाचित्रकारही होते. त्यांचं ग्लासवर्क पेन्टिंग मुंबईतील आर्ट सर्किटमध्ये प्रसिद्ध होत्या. ते स्वतः पौराणिक तज्ज्ञदेखील होते आणि स्वत: ला महालक्ष्मीचं लाडकं बाळ मानायचे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YhyiUe