Full Width(True/False)

रियाच्या नव्हे अंकिताच्या घराचे हफ्ते फेडत होता सुशांत; ईडीच्या तपासात खुलासा

मुंबई: अभिनेता मृत्यूप्रकरणात ईडीने कसून तपास सुरू ठेवला आहे. सुशांत मृत्यू प्रकरणात पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा सक्तवसुली संचालनालयास (ईडी) संशय आहे. यासाठीच संचालनालयाकडून सुशांतच्या संबंधितांची कसून चौकशी आतापर्यंत करण्यात आली आहे. या चौकशीत एक धक्कादायक माहिती अशी समोर आली आहे की, सुशांतच्या बॅंक अकाऊंटमधून त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या घराचे हफ्ते जात होते. या प्रकरणातील मुख्य संशयित सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक, या दोघांची ईडीच्या पाच अधिकाऱ्यांच्या चमूने सलग दोन दिवस १९ तास चौकशी केली. त्याखेरीज रियाचे वडील इंद्रजीत आणि दोघांच्याही सीएंचीही चौकशी झाली आहे. या सर्वांच्या चौकशीखेरीज आर्थिक व्यवहारांची नेमकी माहिती बाहेर येण्यासाठी सुशांतची माजी व्यवस्थापिका श्रृती मोदी, हिलाही दोन वेळा चौकशीसाठी बोलवले होते. परंतु या सर्व चौकशीतून अद्यापही ठोस अशी माहिती मिळालेली नाही. पण त्याच्या बॅंक अकाऊंटमधून त्याची एक्स गर्लफ्रेंड हिच्या घराचे हफ्ते जात असल्याचं आता समोर आलं आहे. सुशांत आणि अंकिता तब्बल सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. २०१६ला ते लग्नही करणार होतो. त्यामुळं त्यांनी एक घर खरेदी केलं होतं. दोघंही या घरात राहायचे. परंतू अचानक दोघांमध्ये काही तरी बिनचलं आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतनं ते घर सोडलं आणि तो वांद्रे इथं घर भाड्यानं घेऊन राहू लागला. त्यांच्या ब्रेकअपनंतरही सुशांतच अंकिताच्या घराचे हफ्ते फेडत होता हे समोर आलं आहे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत एकत्र काम करत होते. त्यानंतर सुशांतनं मालिका सोडली आणि तो बॉलिवूडमध्ये गेला. तिथं स्थिरावण्यासाठी त्यानं जोरदार प्रयत्न सुरू केले. या दरम्यानच दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर २०११मध्ये एका डान्सरिअॅलिटी शोमध्ये सुशांतनं अंकिताला मागणी घातली होती. तिनंही त्याला होकार दिला. आपण लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण काही दिवसानंतर एका पार्टीमध्ये अंकितानं सुशांतला एक सणसणीत थोबाडीत दिल्याच्या बातम्यांनी मध्ये खळबळ उडवून दिली होती. पण त्यानंतर दोघांनीही या घटनेचा इन्कार केला होता‘आमच्यात असं काही झालेलंच नाही. आम्ही पूर्वीसारखेच एकमेकांच्या गाढ प्रेमात आहोत. आमच्याविषयी असं काहीतरी छापणाऱ्या लोकांची तर आम्हाला कीवच येते.’असं या दोघांचं म्हणणं होतं. पण काही दिवसांतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PQvskK