मुंबई- श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा दुसरा सिनेमा ': द कारगिल गर्ल' १२ ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. मात्र आता हा सिनेमा वादात सापडला आहे. फ्लाइड लेफ्ट. गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारीत या सिनेमावर भारतीय वायुसेनेने आक्षेप घेतला आहे. या आक्षेपानंतरच सिनेमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं असून आयएमडीबी येथे सिनेमाचे रेटिंगही सातत्याने कमी होत आहे. सिनेमाच्या रेटिंगची घसरण होऊन १० पैकी ४.६ रेटिंग मिळाले आहे. घराणेशाहीवरून सोशल मीडियावर ट्रोलिंग गुंजन सक्सेना युद्धात सहभागी झालेल्या देशातील पहिल्या महिला वायुसेना अधिकारी होत्या. यासाठी त्यांना शौर्य चक्र देण्यात आले होते. विशेष म्हणजे समीक्षक आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटाचे कौतुक होत असतानाच, वायुसेनेच्या आरोपांनंतर या सिनेमाला घराणेशाहीचं प्रोडक्ट म्हटलं जात आहे. वायुसेनेने अनेक दृष्यांवर घेतला आक्षेप सोशल मीडियावर 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' सिनेमाला घराणेशाहीचं प्रोडक्ट म्हणून ट्रोल केलं जात आहे. एवढंच नाही तर भारतीय हवाई दलाने सिनेमातील बर्याच सीनवर आक्षेप घेतले असून सेन्सॉर बोर्डाकडेही तक्रार केली आहे. या संदर्भात हवाई दलाने सेन्सॉर बोर्डाला लेखी तक्रार दिली असून या सिनेमात काही पात्रांना नकारात्मक दर्शविल्यावर आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाला दिलेल्या तक्रारीत हे आहेत आरोप वायुसेनेने आपल्या तक्रारीत स्पष्ट केले की, 'एक्स फ्लायड लेफ्ट. पडद्यावर गुंजन सक्सेना यांना मोठं दाखवण्यासाठी मेसर्स धर्मा प्रॉडक्शनने अशा अनेक गोष्टी दाखवल्या ज्याचा काहीही संबंध नाही. त्यातही भारतीय वायूसेना महिलांना काम करण्यासाठी अयोग्य असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iAooVv