नवी दिल्लीः करोना लॉकडाउन नंतर चायनीज स्मार्टफोनची अमेरिकेत जबरदस्त विक्री होत आहे. ग्लोबल मार्केट अनालिस्ट फर्म Canalys ने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, यूएस मार्केटमध्ये १० पैकी ७ स्मार्टफोन्स हे मेड इन चायना स्मार्टफोन आहेत. दुसऱ्या तिमाहीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. २०२० मध्ये दुसऱ्या तिमाहीत यूएस मार्केटमध्ये ३.१९ कोटी युनिट्सची शिप झाली. जी आधी ११ टक्के होती. वाचाः स्मार्टफोन शीपमेंटमध्ये अॅपल आणि सॅमसंग टॉपवर आहे. दरम्यान, रिपोर्टमध्ये म्हटले की, 'Q2 2020 मध्ये अमेरिका मध्ये शीप करण्यात आलेल्या जवळपास ७० टक्के स्मार्टफोन चीनमध्ये बनवण्यात आले आहे. जे आधीच्या तिमाहीत ६० टक्के होते. दुसऱ्या तिमाहीत यूएस स्मार्टफोन मार्केट शिपमेंट मध्ये वर्षाच्या आधारावर ५ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. वाचाः अॅपल आणि सॅमसंगने मिळून ७०.३ टक्के मार्केट शेयर मिळवले आहेत. या दरम्यान दोन्ही कंपन्या अनुक्रमे १.५ कोटी आणि ७४ लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर दक्षिण कोरियाची कंपनी एलजी आणि चिनी कंपनी Lenevo आहे. वाचाः Canalys च्या रिपोर्टनुसार, चायनीज फॅक्टरी मार्चच्या अखेरपासून पुन्हा एकदा सुरु झाली आहे. रिटेल स्टोर मे आणि जून मध्ये उघडण्यात आले आहेत. बाजाराची लागोपाठ ग्रोथ होत आहे. यूएस स्मार्टफोन मार्केटमध्ये ओव्हरऑल शिपमेंट जरी वाढली असली तरी परंतु, ग्राहकांना स्वस्त आणि लो-एंड डिव्हाइसेसला पसंत करीत असतात. आकड्यानुसार, दुसऱ्या तिमाहित अॅपल शेयर iPhone 11 आणि iPhone SE मुळे वाढले आहे. यूएसमध्ये एका स्मार्टफोनची साधारण किंमत ५०३ डॉलर झाली आहे. जी दुसऱ्या तिमाहीत १० टक्के कमी आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kIRzYi