मुंबई- रिया चक्रवर्तीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतचं कुटुंब, अंकिता आणि सुशांतच्या मानसिक आरोग्याबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. या रियाच्या मुलाखतीनंतर कुटुंबीय आणि यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. रियाचा दावा १: चंदीगडमध्ये ताई आणि भावोजींनी का थांबवलं नाही? रिया चक्रवर्तीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की सुशांत चंदीगडला जायला निघाला तेव्हा ती फार आनंदी होती. सुशांतला स्वतःला त्यांच्यासोबत रहायचं नव्हतं. रियाने त्याच्या चंदीगड ट्रीपचा उल्लेख केला आणि प्रश्न विचारला की, जर असंच असतं तर त्याच्या कुटुंबियांनी त्याला चंदीगडहून परत मुंबईला जाण्याची परवानगी का दिली? सुशांतला त्याच्या ताईने का थांबवलं नाही? सुशांतच्या कुटुंबाचं उत्तर रियाच्या मुलाखतीनंतर श्वेता सिंहने एकामागोमाग एक ट्वीट केले. एका ट्वीटमध्ये तिने लिहिलं की, जानेवारीचा महिना होता जेव्हा त्याने राणी दी ला त्याला वाचवण्यासाठी बोलावलं. त्याला ड्रग्ज दिले जात होते. त्याला फार मिसळू दिलं जायचं नाही आणि तो एकटा पडला होता. चंदीगडला तो गेला असता रियाने त्याला दोन दिवसांमध्ये २५ वेळा फोन केला. का? त्याला परत बोलावून घेण्याची काय गरज होती? रियाचा दावा २: सुशांतला विमाना ची भीती वाट ायची रियाने आपल्या मुलाखतीत म्हटलं की सुशांतला विमानात बसण्याची भीती वाटायची. हे त्याने स्वतः युरोप ट्रीपच्या दरम्यान रियाला सांगितलं होतं. यासाठी तो एक औषधही घेत होता. ते औषध सुशांतकडे नेहमी असायचं. अंकिता लोखंडेचं उत्तरः रियाच्या या दाव्यावर अंकिता लोखंडेने एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो सिम्युलेटरमध्ये दिसत आहेत. रियाचा दावा ३: सुशांतचं कुटूंबाशी नातं चांगलं नव्हतं रियाने मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं की सुशांत तिला भेटण्यापूर्वी जवळपास पाच वर्ष वडिलांशी बोलला नव्हता. त्याचं फारसं नातंही नव्हतं. रिया म्हणाली की सुशांतच्या मानसिक आरोग्याविषयी पूर्ण माहिती असूनही कुटुंबीयांनी सुशांतला साथ दिली नाही. सुशांतच्या कुटुंबाचं उत्तर- सुशांतच्या बहिणीने श्वेताने अजून एक ट्वीट करत यावर उत्तर दिलं. श्वेताने लिहिले की, ‘जसं रिया बोलली की आमचं आमच्या भावावर प्रेम नव्हतं. ते अगदी बरोबर.. म्हणूनच जेव्हा मला कळलं की त्याची तब्येत ठीक नाही मी जानेवारीत अमेरिकेतून भारतात आले. माझा पूर्ण व्यवसाय आणि मुलांना सोडून मी त्याला भेटायला आले.’ श्वेताने यावेळी तिच्या विमानाचं तिकीटही शेअर केलं. रियाचा दावा ४- २०१३ मध्ये नैराश्यामुळे मानसोपचारतज्ज्ञाला भेटलेला सुशांत रिया म्हणाली की, सुशांत पहिल्यापासूनच डिप्रेशन आणि एन्झायटीने ग्रस्त होता. यूरोप ट्रीपमध्ये त्याने स्वतः ही गोष्ट रियाला सांगितली. यासोबतच २०१३ मध्ये तो मानसोपचारतज्ज्ञाला भेटलेला असंही त्याने रियाला सांगितलं होतं. अंकिता लोखंडेचं उत्तर- रियाच्या या दाव्यावर अंकिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. यात तिने स्पष्ट केलं की, २३ फेब्रुवारी २०१६ जोपर्यंत मी आणि सुशांत एकत्र होतो त्याला अशा पद्धतीचा कोणताही त्रास नव्हता. तसंच तो कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञाला भेटला नाही. तो पूर्णपणे स्वस्थ होता. रियाचा दावा ५- सुशांतच्या बहिणीने बदलला स्टाफ याच मुलाखतीत रियाने सांगितलं की, सुशांतच्या घरचा स्टाफ तिने बदलला नसून प्रियांकाने बदललेला होता. सिद्धार्थ पिठाणी, सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंतला सुशांतनेच रियाला भेटवलं होतं. सुशांतच्या स्टाफचा दावा सुशांतच्या स्टाफने मीडिया समोर येऊन अनेकदा हे मान्य केलं आहे की, रिया आल्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. सुशांतच्या आयुष्यात रिया आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32y6s7S