मुंबई-बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेक लोकांची चौकशीही केली होती. पण सुशांतच्या वडिलांनी आणि इतरांविरूद्ध पाटण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर हा खटला सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ड्रग अँगल सुशांतच्या अनाकलनीय मृत्यूच्या बाबतीत, जेव्हा ड्रग्जचा अँगल समोर आला तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला होता. ड्रग्स घेतल्याचं उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) हस्तक्षेप केला. एनसीबीने रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एनसीबी लवकरच रियाच्या रक्ताचा नमुना घेणार आहे. यासोबतच एनफोर्समेंट डायरेक्टरेट () देखील पैशांसदर्भात तपास करत आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड सुशांतसिंह राजपूतच्या शवविच्छेदन अहवालात 'मृत्यूच्या वेळेचा' उल्लेख न केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. जेव्हा सीबीआयच्या पथकाने हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून घेतले तेव्हा त्यांनी एम्सच्या फॉरेन्सिक टीमची मदत घेतली. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, एम्सच्या फॉरेन्सिकचे प्रमुख सुधीर गुप्ता यांनी पोस्टमार्टम अहवालात अनेक त्रुटी असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, पोस्टमॉर्टम अहवालात सुशांतच्या मृत्यूच्या वेळेचा उल्लेख नसल्यामुळे मुंबई पोलिसांनी याबाबत दुसरे मत घ्यायला हवे होते. सुधीर गुप्ता यांनी संपूर्ण माहिती सीबीआयला दिली. सीबीआयच्या एका टीमने कूपर इस्पितळात अटॉप्सी करणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी केली. रिया चक्रवर्तीने हार्ड ड्राइव्ह नष्ट केली? सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात सीबीआयच्या पथकाने अभिनेत्याच्या घरात उपस्थित असलेल्या साऱ्यांची चौकशी केली. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, सुशांतचा फ्लॅट पार्टनर सिद्धार्थ पिठाणीने सीबीआयकडे मान्य केलं की रिया चक्रवर्तीने ८ जून रोजी सुशांतच्या हार्ड ड्राइव्ह नष्ट केल्या. त्याच दिवशी तिने सुशांतचं घरही सोडलं. रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचं चॅट सुशांतच्या मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि महेश भट्टच्या चॅटने खळबळ उडवली होती. ८ जून रोजी, महेश आणि रिया यांच्यात झालेल्या संभाषणातून स्पष्ट दिसून आलं की, रियाने भट्ट यांना सांगितलं की, तिच्या आणि सुशांतच्या नात्याबद्दल वडील नाखूष होते. याचमुळे ती ब्रेकअप करत असल्याचं सांगितलं. यात महेश भट्ट रियाला आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला देताना दिसतात. मुंबई पोलिसांच्या तपासात चूक टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, सीबीआयच्या पथकाला मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासणीत अनेक कमतरता आढळल्या. सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह योग्यप्रकारे न हाताळल्याचा दोष सीबीआयच्या टीमने मुंबई पोलिसांना दिला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lvlvrm