Full Width(True/False)

'मला माहितीये रिया चक्रवर्ती कुठे लपली आहे'

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये रिया चक्रवर्तीचं नाव आल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे. दोन राज्यांची पोलीस याप्रकरणी चौकशी करत होती. आता केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपावला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी रिया तिच्या कुटुंबियांसोबत रातोरात गायब झाल्याचं म्हटलं जात आहे. आता सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी सांगितलं की त्यांना माहीत आहे की रिया कुठे आहे. सुशांतच्या वडिलांनी रियासह अजून पाचजणांवर पटणात एफआयआर दाखल केली. रिपोर्टनुसार यानंतर रिया आणि तिचं कुटुंब तेव्हापासून बेपत्ता आहे. रियाने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने म्हटलं होतं की तिच्याबद्दल आणि तिच्या कुटुंबियांबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत. असं असलं तरी तिला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. दरम्यान एका मुलाखतीत सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी सांगितले की रिया लपून बसली आहे आणि त्यांना माहीत आहे की ती नेमकी कुठे आहे. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना मदत करत नसल्यामुळे तपासात अनेक व्यत्यय येत आहेत. तसेच बिहारहून आलेल्या आयएएस अधिकाऱ्याला विनय तिवारी यांना जबरदस्ती क्वारन्टीन करण्यात आले. या सगळ्यावरून मुंबई पोलिसांना ही केस सोडवायची नसल्याचं दिसतं असं म्हणाले. याचमुळे सुशांतच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विकास यांनी एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की, ‘एकतर लपली आहे. मला माहीत आहे की ती कुठे लपली आहे, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही. जुनी पटणाची टीम जी आधीपासूनच मुंबईत आहे त्यांना क्वारन्टीन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सीबीआयने आता ही केस हातात घेऊन सुशांतच्या रहस्यमयी मृत्यूवरून पडदा उठवला पाहिजे.’ दरम्यान, बिहार सरकारच्या याचिकेनंतर केंद्र सरकारने ही केस सीबीआयकडे दिली असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जस्टिस एच रॉय यांना दिली. यासोबत रिया चक्रवर्तीनेही व्हावी अशी मागणी केली होती. तसेच सुशांतची केस पटणातून मुंबईत यावी या रियाच्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सुरू आहे. रियाच्या वकिलांनी सांगितलं, दुसऱ्या राज्याच्या पोलिसांना नाही तपासाचा अधिकार- मंगळवारी बिहार सरकारने सुशांतच्या वडिलांच्या मागणीवर केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, राज्य सरकारने मंगळवारी सीबीआय चौकशीची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. या मागणीला आव्हान देत रियाचे वकील म्हणाले होते की, कोणत्याही राज्य सरकारला अशा प्रकारची शिफारस करण्याचा अधिकार नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3idRBpf