Full Width(True/False)

सॅमसंगचा ड्यूल कॅमेऱ्याचा टॅब S7 आणि S7+ लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः दिग्गज टेक कंपनी सॅमसंगने आज लेटेस्ट टॅब Galaxy Tab S7 आणि Galaxy Tab S7+ लाँच केले आहेत. ड्यूल रियर कॅमेरा सेटअप सोबत येणाऱ्या टॅब एस ७ सीरीज वाय फाय ओन्ली, वाय फाय प्लस ४ जी सोबत वाय फाय प्लस ५ जी कनेक्टिविटी ऑप्शन दिले आहेत. टॅब S7 च्या ६जीबी रॅम+ १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ६९९ यूरो (जवळपास ६२ हजार रुपये) तर याच्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ७७९ यूरो (जवळपास ६९ हजार १०० रुपये) किंमतीत लाँच केले आहे. या टॅबला ४जी व्हेरियंटमध्ये ७० हजार ९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. वाचाः गॅलेक्सी S7+ च्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंतच्या स्टोरेजच्या ऑप्शनमध्ये येते. याची सुरुवातीची किंमत ८९९ यूरो (जवळपास ७९ हजार ९०० रुपये तर ५जी व्हेरियंटच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १०९९ यूरो (जवळपास ९७ हजार ५०० रुपये) आहे. वाचाः गॅलेक्सी टॅब S7 चे खास वैशिष्ट्ये टॅबमध्ये 2560x1600 पिक्सल रेजॉलूशन सोबत 11 इंचाचा WQXGA LTPS TFT डिस्प्ले दिला आहे. 120Hz च्या रिफ्रेश रेट च्या टॅब अँड्रॉयड १० ओएसवर काम करतो. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेजच्या या टॅबमध्ये स्नॅपड्रॅगन 865+ एसओसी प्रोसेसर दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने मेमरी १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः S Pen सोबत येणाऱ्या या टॅबमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा प्लस ५ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. हा कॅमेरा एलईडी फ्लॅश आणि ऑटोफोकस सपोर्ट दिला आहे. टॅबच्या फ्रंटमध्ये वेबकॅमचा वापर करण्यासाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. टॅबला पॉवर देण्यासाठी यात 7,040mAh ची बॅटरी दिली आहे. जी सिंगल चार्जवर तीन तासापर्यंत व्हिडिओ प्ले बॅक देते. टॅबचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः गॅलेक्सी टॅब S7+ चे वैशिष्ट्ये गॅलेक्सी टॅब S7+ मध्ये तुम्हाला 2800x1752 पिक्सल रेजॉलूशन सोबत 12.4 इंचाचा WQXGA+ सुपर AMOLED डिस्प्ले मिळतो. 120Hz के रिफ्रेश रेट सोबत येतो. ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेजच्या या टॅबमध्ये स्नॅपड्रॅगन 865+ SoC प्रोसेसर दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने टॅबची मेमरी १ टीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2C6tpFY