Full Width(True/False)

शाओमी रेडमी ९ प्राईमचा आज पहिला फ्लॅश सेल

नवी दिल्लीः शाओमीकडून लेटेस्ट स्मार्टफोनला नुकतेच लाँच करण्यात आले आहे. याचा पहिला सेल आज सोमवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शॉपिंग साईट अॅमेझॉन इंडिया आणि कंपनीची अधिकृत साईट Mi.com वर सुरू होणार आहे. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन खरं म्हणजे Redmi 9 ग्लोबल व्हर्जनचा रिब्रँडेड व्हेरियंट आहे. या फोनला जूनमध्ये स्पेनमध्ये लाँच करण्यात आले होते. वाचाः Redmi 9 Prime ची किंमत शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत ९९९९ रुपयांपासून सुरू होते. ही किंमत ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. या फोनचा दुसरा व्हेरियंट ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये येतो. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. फोनला चार कलरमध्ये म्हणजेच स्पेस, ब्लू, मिंट ग्रिन, सनराईज फ्लेयर आणि मॅट ब्लॅक मध्ये खरेदी करता येवू शकते. वाचाः Redmi 9 Prime ची खास वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. पिक्सल डेंसिटी 394ppi देण्यात आली आहे. यात Aura 360 डिजाइन, रिपल टेक्सचर आणि 3D यूनीबॉडी डिझाईन दिली आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोससर दिला आहे. जे Mali-G52 जीपीयू सोबत येतो. फोनमध्ये डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्डचा स्लॉट सुद्धा दिला आहे. वाचाः या फोनमध्ये रियर वर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा मेन सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा वॉटरड्रॉप नॉच सोबत येतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5,020mAh ची बॅटरी 18W चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kYrLb9