Full Width(True/False)

'पोलिसांनीच फेसबुकवर शेअर केले सुशांतच्या मृतदेहाचे फोटो'

मुंबई- एक दिवसआधी सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह इस्पपितळात नेणाऱ्या अॅम्ब्यूलन्सच्या ड्रायव्हरने दावा केला होता की त्याला आंतरराष्ट्रीय नंबरवरून धमक्यांचे फोन येत आहे. चालक आपल्या सहकाऱ्यांसोबत सुशांतच्या घरी गेला होता आणि त्याचा मृतदेह घेऊव कूपर इस्पितळात गेला होता. आता शहनवाजने अजून एक धक्कादायक विधान केलं आहे. हा दावा टाइम्स नाउने हिडन कॅमेऱ्याने घेतलेल्या मुलाखतीत समोर आला. शहनवाजने या व्हिडिओमध्ये म्हटलं की, जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा सुशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत नव्हता तर त्याला खाली उतरवण्यात आलं होतं. तसंच त्याच्यावर पांढरा कपडा घातला होता. यासोबतच मुंबई पोलिसांमधील काहींनी सुशांतचे फोटो घेऊन ते फेसबुकवर अपलोड केले होते. तसेच सुरुवातीला पोलिसांनी सुशांतचा मृतदेह नानावटी इस्पितळात नेण्यास सांगितले होते. मात्र काही वेळाने त्यांनी सांगितलं की मृतदेह कूपर इस्पितळात न्यायचा आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येपासूनच त्याच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सगळ्यात मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं की ते या प्रकरणाची अगदी योग्य पद्धतीने तपासणी करत आहेत. पण तरीही त्यांच्यावर योग्य पद्धतीने तपासणी करत नसल्याचे आरोप केले जात आहेत. बिहार पोलिसांचे डीजीपी यांनी मुंबई पोलिसांवर तपास योग्य पद्धतीने न करण्याचा आरोप केला होता. याशिवाय एक दिवस आधी सुशांतच्या वडिलांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात मुलाच्या जीवाला धोका असल्याचं सांगत पोलिसांना सावध केलं होतं, असंही म्हटलं आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले होते की, '२५ फेब्रुवारी रोजी मी वांद्रे पोलिसांना सावध केलं होतं. माझ्या मुलाच्या सुशांतच्या जीवाला धोका असल्याचं मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी काही केलं नाही. १४ जूनला जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा २५ फेब्रुवारी रोजी ज्यांच्याविरोधात मी तक्रार केली त्यांच्यावर कारवाई करण्याचं सांगितलं. मात्र ४० दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. यानंतर मी पटणात गेलो आणि तिथे एफआयआर दाखल केली. पटणा पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. आता आरोपी पळत आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3i8yIDU