Full Width(True/False)

'सुशांतच्या अंत्यसंस्काराला रियाला थांबवण्यात आलं'

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यी प्रकरणात जेव्हापासून त्याच्या वडिलांनी केके सिंह यांनी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केली तेव्हापासून ती लोकांच्या निशाण्यावर आली आहे. असं म्हटलं जात आहे की अनेक दिवसांपासून रिया बेपत्ता आहे. पण तिचे वकील यांनी याबाबत माहिती दिली. सतीश म्हणाले की, रिया सुरुवातीपासूनच मुंबईत राहत आहे. १४ जून रोजी ती मुंबईत होती. तिला सुशांतच्या अंत्यसंस्कारातही सहभागी करून घेतलं नाही. तिचं नाव २० लोकांच्या लिस्टमधून काढून टाकण्यात आलं होतं. रियाने नोंदवला स्वतःचा जबाब सतीश पुढे म्हणाले की, 'रियाला मुंबई पोलिसांनी १८ जून रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. तिथे तिचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर १७ जुलैलाही तिला सांतांक्रुझ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. रिया तिथे गेली आणि तिचा जबाब पुन्हा नोंदवण्यात आला.' रियाने केस मुंबईत हसवण्याची केली मागणी पटणामध्ये रियाविरोधात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरनंतर बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत आली. तर रियाने सर्वोच्च न्यायालयात ही केस पटणाहून मुंबईत हलवण्याची मागणी केली. रियाच्या या याचिकेचा बिहार सरकारने विरोध केला. बिहार पोलिसांना चौकशीचा अधिकार नाही रियाच्या वडिलांनी मानेशिंदेंनी सांगितलं की, 'रियाने सर्वोच्च न्यायलयात अपिल केलं आणि ३० जुलैला ट्रान्सफर पिटीशन फाइल केली. जर मुंबईत या प्रकरणाची चौकशी होत आहे आणि हे प्रकरण मुंबईतलंच आहे तर बिहार पोलिसांनी या केसची तपासणी करण्याचा कोणताही अधिकार नाही.' दरम्यान, सुशांतचे वडील केके सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी म्हटलं की, '२५ फेब्रुवारी रोजी मी वांद्रे पोलिसांना सावध केलं होतं. माझ्या मुलाच्या सुशांतच्या जीवाला धोका असल्याचं मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी काही केलं नाही. १४ जूनला जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा २५ फेब्रुवारी रोजी ज्यांच्याविरोधात मी तक्रार केली त्यांच्यावर कारवाई करण्याचं सांगितलं. मात्र ४० दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. यानंतर मी पटणात गेलो आणि तिथे एफआयआर दाखल केली. पटणा पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. आता आरोपी पळत आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XpEAkw