मुंबई- सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी बिहारमध्ये आणि तिच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करत आहे. मनी लॉण्ड्रिंगच्या दृष्टीकोनातून आता या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार सुशांतने एका टॅलेन्ट मॅनेजमेन्ट कंपनीला मोठी रक्कम दिली होती. या कंपनीने नंतर सुशांतने दिलेल्या पैशांमधला काही हिस्सा रिया चक्रवर्तीला दिला होता. २.०५ कोटींचा होता करार टाइम्स नाऊने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ईडीमधील एका सूत्राने ही माहिती दिली आहे. त्यानुसार सुशांतने टॅलेन्ट मॅनेजमेन्ट एजन्सीला ६२ लाख रुपये दिले होते. तर एजन्सीने रिया चक्रवर्तील त्यातले २२ लाख रुपये दिले. रिपोर्ट्सनुसार, सुशांतने आसाम ते तमिळनाडूपर्यंतच्या कंपन्यांसोबत २.०5 कोटी रुपयांचा करार केला होता. करार होण्यापूर्वी हे पैसे रियाच्या अकाउन्टमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. ईडीने एजन्सीच्या मॅनेजरची केली चौकशी टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, ईडीने दोन दिवसांपूर्वी या एजन्सीच्या मॅनेजरची चौकशी केली. यासोबतच ईडीने आतापर्यंत सुशांतच्या घरातील कर्मचारी, रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सुशांतची बहीण मीतू यांची चौकशी केली आहे. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी केके सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयदेखील या प्रकरणात उडी घेतली आहे. ईडी या प्रकरणाची मनी लॉण्ड्रिंगच्या दृष्टीने रिया आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी करत आहेत. तसेच या प्रकरणात सीबीआयनेही एफआयआर नोंदवली असून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणाची सीबीआय, मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांपैकी नक्की कोण चौकशी करणार याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31U6oig