मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये रिया चक्रवर्तीची पहिल्या दिवशी सीबीआयने जवळपास १० तास चौकशी केली. आता दुसऱ्या दिवशीही तिला सीबीआयच्या कठीण प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. यावेळी फक्त रियालाच नाही तर तिचा भाऊ शौविकलाही प्रश्न विचारणार आहे. रिपोर्टनुसार, रियाची चौकशी नुपूर प्रसाद करतील. त्याच रियाला या संबंधीचे सर्व प्रश्न विचारतील. मीडिया रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी रियाला युरोप ट्रिप, सुशांतसोबतचं तिचं नातं णि ८ जून ते १४ जूनमध्ये घडलेल्या घडामोडींसंदर्भात प्रश्न विचारले. टाइम्स नाऊच्या मते, दुसऱ्या दिवशी सीबीआय रियाला ड्रग्जशी संबंदीत प्रश्न विचारणार. ड्रग्जशी संबंधीत प्रश्न काही दिवसांपूर्वी रियाचे ड्रग चॅटशी संबंधीत स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. रिपोर्ट्सनुसार रियानेही ते तिचे मेसेज असल्याचं मान्य केलं होतं. सीबीआय रियाला ड्रग्जशी संबंधित पुढील प्रश्न विचारू शकतात. - सुशांत ड्रग्ज घ्यायचा का? - रियाने कधी ड्रग्ज घेतले होते का? - रिया आणि तिच्या साथीदारांना ड्रग्ज कोण आणून द्यायचं? - २०१७ मध्ये कोणाशी आणि कोणत्या ड्रग्जबद्दल बोलणं झालेलं? - गौरव आर्य कोण आहे? त्याने कधी ड्रग्ज आणून दिले होते का? - सुशांतला कधी चोरून ड्रग्ज देण्यात आले का? - सुशांत ने कधी ड्रग्जचा ओव्हरडोस केला होता का? यात रियाची काय भूमिका होती? - रिया आणि सुशांतला ओळखणाऱ्या लोकांपैकी कोण ड्रग्ज घ्यायचं? - सप्लायर्सकडून कोण ड्रग्ज घ्यायचं? - सुशांतच्या ड्रग्जच्या व्यसनाबद्दल सुशांतच्या कुटुंबियातील कोणाला कल्पना होती का? - जया, श्रुति मोदी, आयुष, सॅम्युअल, दिपेश आणि सिद्धार्थ पिठाणी यांचं ड्रग्जशी काही कनेक्शन आहे का? सुशांतला कशी भेटली रिया रिपोर्टनुसार, सीबीआयच्या टीमने रियाशी सुरुवाकीला तिच्या आणि सुशांतच्या नात्याबद्दल काही प्रश्न विचारले. ती सुशांतला कधी भेटसी.. दोघांमधलं नातं कसं होतं... दोघांमध्ये काही भांडण होतं का.. विशेष म्हणजे सीबीआयने रियाला भेटण्यापूर्वीच पूर्ण अभ्यास करून ठेवला असून प्रश्नांची एक मोठी यादीच त्यांनी तयार केली आहे. १. सुशांत आणि तिच्यात नेमकी असं काय धालं की ८ जूनला तिने सुशांतचं घर सोडलं? २. सुशांतला कोणत्या गोष्टीची चिंता होती का? जर होती तर ती कोणती गोष्ट होती? ३. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी अर्थात १४ जून रोजी रिया कुठे होती आणि काय करत होती? ४. सुशांत कोणत्या प्रकारच्या गोळ्या घ्यायचा आणि रियाने त्याला कोणत्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला होता का? ५. रियाने सुशांतला कोणत्या डॉक्टरांची भेट घालवून दिली होती का? ६. सुशांत हिंदूजा इस्पितळात का भरती झाला होता? ७. सुशांतच्या तब्येतीबद्दल रियाने त्याच्या कुटुंबियांना सांगितलं होतं का? ८. सुशांतसोबत रियाने कोणता सिनेमा साइन केला होता का? ९. रियाच्या वडिलांनी सुशांतला कोणत्या औषधाबद्दल सांगितलं होतं का? १०. सुशांतच्या पैशांशी निगडीत सर्व निर्णय रियाच घ्यायची का? ११. सुशांतसोबत रियाचं नातं कसं होतं? रिया त्याला कधी आणि कशी भेटली होती? १२. सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने त्याच्या कुटुंबियांना फोन केला होता का? १३. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया त्याच्या घरी गेली होती का? १४. कूपर इस्पितळाच्या शवागारात रिया का गेली होती? १५. मुंबई पोलिसांनी रियाची कितींदा चौकशी केली? १६. सुशांतसोबत मिळून रियाने नवीन कंपनी का स्थापन केली? १७. लॉकडाउनमध्ये रियाला तिच्या घरी भेटायला कोण- कोण आलं होतं? १८. सुशांतच्या बहिणीशी रियाचं काही भांडण होतं का? १९. रियाने सुशांत आणि तिच्या नात्याबद्दल कोणाकोणाला सांगितलं होतं? २०. रियाने डिसीपी (वांद्रे) यांना का फोन केला होता? २१. सुशांतचा मृत्यू कसा झाला असेल असं रियाला वाटतं? २२. रिया सिद्धार्थ पिठाणीला कधी भेटली होती? २३. रियाने सुशांतच्या घरच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून का काढून टाकलं होतं? २४. रिया पिठाणी आणि सॅम्युअल मिरांडाच्या संपर्कात अजूनही आहे का? २५. यूरोप ट्रीपमध्ये काय झालं होतं? २६. सुशांतच्या बँक अकाउंटमधल्या पैशांचं काय झालं? खर्च झाला तर कुढे खर्च झाला? २७. रियाने हार्ड डिस्क का डिलीट केली? त्या हार्ड डिस्कमध्ये काय होतं? २८. एका मुलाखतीत सांगितलं की सुशांत ड्रग्ज घ्यायचा... रियाला याबद्दल कधी कळलं आणि तिने थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का? २९. रियाने किंवा तिच्या भावाने सुशांतसाठी ड्रग्ज विकत घेतले होते का? ३०. सुशांतसाठी ड्रग्ज कोण आणायचं आणि त्यासाठी पैसे कोण द्यायचं?
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31Ifobz