मुंबई: '' या चित्रपटात झळकलेला अभिनेता '' या नव्या मालिकेतून नायक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. एका लठ्ठ मुलीची आणि फिटनेससाठी नेहमी घाम गाळणाऱ्या एका मुलाची गोष्ट सांगणारी ही मालिका असल्याचं दिसतंय. समीर यामध्ये '' या 'फिटनेस फ्रिक' तरुण नायकाची भूमिका करत आहे. मनोरंजनाच्या विविध माध्यमांतून अनके तरुण चेहरे चमकत आहेत. असाच एक तरुण कलाकार म्हणजे समीर परांजपे. 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकेतील एका छोट्या पात्रापासून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर 'गोठ', 'गर्जा महाराष्ट्र' आणि काही महिन्यांपूर्वी आलेली 'अग्निहोत्र २' या मालिकेत त्यानं नायकाची भूमिका साकारली. 'भातुकली' या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. नेटफ्लिक्सच्या 'क्लास ऑफ ८३'मधून नुकताच दिसलेला समीर आता 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेत एका वेगळ्या नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'क्लास ऑफ ८३' निमित्ताच्या 'अस्लम'च्या भूमिकेसाठी त्यानं घेतलेली मेहनत ही लोकांना चांगलीच आवडली आहे. 'क्लास ऑफ ८३'साठी त्याला अचानक फोन आला आणि त्याच्या या चित्रपटात वर्णी लागली. २ महिन्यांच्या ऑडीशन प्रोसेसमधून त्याची आणि इतरांची निवड करण्यात आली होती. 'बॉलिवूड स्टार बॉबी देओलबरोबर काम मनावर दडपण आलं होतं. पण, ते दडपण बॉबीनं स्वतःच घालवलं', असं समीर सांगतो. या मालिकेत जिथली पार्श्वभूमी दिसणार आहे त्या नाशिक भागातील भाषा त्यानं यासाठी शिकून घेतली आहे. फिटनेसप्रेमी असलेलं पात्र असल्याकारणानं रोजचा व्यायाम सुरू आहे. अमुकच माध्यमात मला काम करायचं असं माझं काहीही नाही. मालिका असो, चित्रपट असो किंवा वेब सीरिज...मला अभिनय करायला आवडतो. अभिनय करण्यात मला आनंद मिळतो. भाषा, शरीर, देहबोली या सगळ्यात आपण काही ना काही प्रयोग करत असतो. माध्यम कोणतंही असो, प्रेक्षकांना आनंद देणं महत्त्वाचं आहे. 'अस्लम'नंतर आता अभिमन्यू लोकांना कसा वाटतो ते पाहायचं आहे. - समीर परांजपे
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gJ9Od4