Full Width(True/False)

सुशांतसिंह राजपूतचा 'या' पुरस्कारानं होणार मरणोत्तर गौरव

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता याला मरणोत्तर '' जाहीर करण्यात आला आहे. २०२१मध्ये होणाऱ्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात ( International Awards हा पुरस्कार देऊन सुशांतचा मरणात्तर गौरव करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड २०२१ ‘मध्ये सुशांतला मरणोत्तर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अशी माहिती या पेजवरून देण्यात आली आहे. इतकंच नाही तर, गेल्या महिन्यात कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीतर्फे देखील मरणोत्तर पुरस्कार देऊन सुशांतचा गौरव करण्यात आला होता. सुमारे एका तपापूर्वी 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेतून सुशांतची तोंडओळख झाली आणि 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून तो या माध्यमाच्या लोकप्रियतेचे शिखर चढला. अर्थात, त्याच्या राजस आणि लोभस व्यक्तिमत्वाला चित्रपटाचे क्षेत्र काही फार दूर नव्हते. अभिषेक कपूर दिग्दर्शित 'काय पो चे' या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा झळकला. अवघ्या चार वर्षांपूर्वी त्याने क्रिकेटपटू एम. एस. धोनी याची मध्यवर्ती भूमिका असणारा चित्रपट केला आणि त्याने बॉक्स ऑफिसच्या यशाचे व लोकप्रियतेचे नवे उच्चांक केले. या चित्रपटात त्याने आपले कसब जसे सिद्ध केले, तसे या क्षेत्रातील त्याचे पाय अधिक मजबूतपणे रोवले जातील, इतके रसिकांचे प्रेम त्याने मिळवले. या व्यतिरिक्त त्याने 'डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी' या दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित चित्रपटात, बंगाली साहित्यात गाजलेल्या पात्राची भूमिका निभावली. 'पीके'मध्ये त्याची भूमिका मध्यवर्ती नसली, तरी कथेचे महत्त्वाचे धागेदोरे पोहोचणाऱ्या या पात्रातूनही तो प्रिय ठरला. शिवाय, त्या चित्रपटाला मिळालेले विक्रमी व्यावसायिक यश हा तर बोनसच होता. 'केदारनाथ', 'छिछोरे' या त्याच्या अन्य चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली. विशेषत:, आता त्याच्या आत्मघाती निधनानंतर 'छिछोरे' चित्रपटाची अधिक चर्चा सुरू झाली आहे; कारण या चित्रपटात नैराश्यावर मात करण्याची आणि आत्महत्येला निरर्थक ठरवणारी अशीच कथा होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31GtuKx