मुंबई- प्रकरणात , ईडी आणि आता नारकोटिक्स ब्युरोची चौकशी सुरू आहे. सीबीआयने मुंबईत चौकशी सुरू केल्यानंतर आठव्या दिवशी या प्रकरणाची मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीची चौकशी केली. रविवारीपर्यंत सलग तीन दिवस तिची चौकशी करण्यात आली. आज सोमवारी चौथ्या दिवशीही रिया चक्रवर्तीची चौकशी केली जात आहे. सीबीआयने तीन दिवसांमध्ये रियाची जवळपास २६ तास चौकशी केली आहे. यादरम्यान, अनेकांच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे रिया चक्रवर्तीला अद्याप अटक का केली जात नाही? सुशांतचे कुटुंबिय आणि त्याचे चाहते करत आहेत रियाच्या अटकेची मागणी सुशांत प्रकरणात त्याच्या मृत्यूनंतर लगेचच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविली. याआधी मुंबई पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पोलिसांनी कोणताही एफआयआर दाखल केली नाही तसेच कोणालाही अटक केले नाही यावरही प्रश्न विचारण्यात आले. अशात जेव्हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला तेव्हा सुशांतच्या कुटुंबियांपासून ते त्याच्या चाहत्यांपर्यंत साऱ्यांनाच वाटलं की आता रियाला अटक केली जाईल. परंतु तपास सुरू होऊन १० दिवस झाले तरी तसं काही झालं नाही. पण असं का हाच प्रश्न आहे. रियाच्या अटकेत अनेक पेच आहेत. त्यामुळे घाईघाईत रियाला अटक करावी आणि नंतर पुराव्याअभावी तात्काळ जामीन मिळावा असं सीबीआयला मुळीच वाटत नाही. तसेच चौकशी सुरू असताना रियाचे ड्रग्ज चॅटही व्हायरल झाले. या चॅटमुळे या प्रकरणात नारकोटिक्स ब्युरोची टीमही आली. आता सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयसह ईडी आणि नारकोटिक्स ब्युरोही करत आहे. रियाच्या अटकेसाठी सीबीआयचं सर्वात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे सुशांतची अटोप्सी, विसरा आणि फॉरेन्सिक तपासाचा अहवाल. सीबीआयने सुशांतच्या घरी क्राइम सीन रिक्रिएट केला आहे. अशा परिस्थितीत फॉरेन्सिक तपासात रियाविरुद्ध काही पुरावे सापडले तर तिला तात्काळ अटक होऊ शकते. परंतु यातही अडचण अशी आहे की हे प्रकरण बऱ्याच उशिराने सीबीआयकडे सोपविण्यात आल्याने सुशांतच्या अॅटॉप्सी, विसरा आणि फॉरेन्सिक तपासणी अहवालावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सध्या सीबीआयकडे रियाचे फोन रेकॉर्ड, बँक स्टेटमेन्ट आणि महत्त्वपूर्ण अशी सर्व कागदपत्रं आहेत. पण रियाला ताबडतोब अटक करता येईल असा एकही पुरावा अद्याप मिळालेला नाही. असं असलं तरी ड्रग्ज चॅटचं प्रकरण रियावर भारी पडू शकतं. पण हे प्रकरण नारकोटिक्स ब्युरोचं आहे. या प्रकरणात रियाला अटक केली तरी ती करेल. सीबीआय नाही. याहून महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे एनसीबीच्या टीमने गुरुवारी मुंबई गाठली. हे कळल्यावर सीबीआयने लगेच शुक्रवारी रियाला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावलं. या मागचं मुख्य कारण म्हणजे सीबीआयला हे समजलं आहे की रिया चक्रवर्तीच्या बाबतीत एनसीबीचं पारडं अधिक मजबूत आहे. अशा परिस्थितीत एनसीबीने रियाला प्रथम बोलावून पुराव्यानिशी अटक केली असती तर सीबीआयला पुढील तपासात अडचणी आल्या असत्या. याचमुळे सध्या सीबीआयकडून रियाची सतत चौकशी केली जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34Ppdq8