या नावावरून हेच स्पष्ट होते की, व्हॉट्सअॅप वर Expiring messages द्वारे चॅट्समध्ये एक निश्चित वेळानंतर मेसेज आपोआप डिलीट होतील. व्हॉट्सअॅप युजर्सला मोबाइलमधी प्रत्येक चॅट्समध्ये जावून ते डिलीट करण्याची आवश्यकता नाही. युजर्संना आपल्या सुविधेनुसार हे फीचर ऑन किंवा ऑफ करता येवू शकणार आहे. ग्रुप चॅटमध्ये हे फीचर केवळ अॅडमिन हँडल करु शकणार आहे. बाकी सदस्यांना त्याचा अॅक्सेस दिला नाही. टाईम लिमिट मध्ये या फीचर्समध्ये एक दिवस, एक आठवडा आणि एक महिना असे ऑप्शन देण्यात येणार आहेत.
हे फीचर याच आठवड्यात व्हॉट्सअॅपमध्ये रोलआउट करण्यात आले आहे. परंतु, सध्या हे भारतात उपलब्ध नाही करण्यात आले. व्हॉट्सअॅप Search on web फीचरचा उद्देश म्हणजे चुकीची आणि भ्रमित करणारी माहिती रोखण्यासाठी हे फीचर मदत करणार आहे. फॉरवर्डेड मेसेजच्या वर आता एक मॅग्निफाइंग ग्लास आयकॉन दिसेल. यावर टॅप केल्यानंतर युजर्स वेब वर रिडायरेक्ट होतील. या ठिकाणी गेल्यानंतर युजर्संना मेसेज चेक करता येईल. तसेच व्हेरिफाय करु शकतील. हे फीचर स्पेन, ब्राझील, ब्रिटन सह अन्य देशात उपलब्ध आहेत. लवकरच हे फीचर भारतात सुद्धा लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सअॅप सध्या चॅट्सला ८ तास, १ आठवडा आणि एका वर्षापर्यंत म्यूट करण्याचा पर्याय कंपनीने युजर्संना दिला आहे. परंतु, आता एका अशा फीचरवर काम सुरू आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्सला नेहमीसाठी चॅट्सला म्यूट करता येवू शकणार आहे. या फीचर्सचे नाव Mute always ठेवण्यात आले आहे. या नवीन फीचर्स मुळे युजर्संना न आवडणाऱ्या चॅट्सला किंवा ग्रुपला एका वर्षापर्यंत तसेच कायम स्वरुपी म्यूट करता येवू शकणार आहे. सध्या या फीचरवर काम सुरू आहे. हे फीचर नक्की कधी उपलब्ध होणार याविषयी कंपनीने अद्याप तारीख जाहीर केली नाही.
व्हॉट्सअॅप पेमेंट सर्विसची टेस्टिंग सर्वात आधी भारतात सुरू झाली आहे. सध्या हे बीटा व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. परंतु, याला अधिकृतपणे लाँच करण्यात आले नाही. व्हॉट्सअॅपला भारतात डेटा लोकलायजेशनच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु, याविषयी ग्रिन चिट मिळाल्याची माहिती आहे. व्हॉट्सअॅपच्या पेमेंट सर्विस यूपीआय बेस्ड आहे. तसेच यासाठी ICICI आणि HDFC बँकांसोबत पार्टनरशीप करण्यात आली आहे. तसेच न्यू इमोजी हे फीचर नाही. परंतु, लवकरच भारतात व्हॉट्सअॅपवर १३८ नवीन इमोजी साठी सपोर्ट करण्याची शक्यता आहे. लेटेस्ट अपडेट सोबत अँड्रॉयड बीटा व्हर्जन साठी हे फीचर उपलब्ध आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fFa2kM