Full Width(True/False)

सोन्याने मढवलेला iPhone 12 Pro तयार, किंमत १७ लाख

नवी दिल्लीः अॅपलचा लेटेस्ट iPhone 12 लाइनअप काही महिन्यांनंतर लाँच होणार आहे. यावेळी फोन मार्केटमध्ये येण्यास थोडा उशीर लागू शकतो. अॅपलने स्वतः यावरून पडदा हटवला आहे. परंतु, सोन्याचा आताच समोर आला आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी चांगली किंमत मोजावी लागणार आहे. लग्झरी फोन बनवणारी कंपनी ब्रँड Caviar कडून याचा फोटो शेयर करण्यात आला आहे. वाचाः कस्टम प्रीमियम डिव्हाईसेज डिझाईनची कंपनी कॅवियर ने iPhone 12 Pro ला १८ कॅरेटच्या सोन्याने मढवले आहे. तसेच बॅक पॅनेलला जबरदस्त पॅटर्न सोबत येतो. याचे नाव iPhone 12 Pro Victory Pure Gold ठेवण्यात आले आहे. हा युनिक डिव्हाईस असणार आहे. फोनवर फ्लोरल डिझाईन शिवाय ०.४८ कॅरेटचे हीरे लावण्यात आले आहेत. वाचाः किंमत १७ लाखांहून अधिक गोल्ड फिनिश आणि लेदरची जबरदस्त पॅकेजिंग मध्ये येणाऱ्या या फोनमध्ये सोन्याशिवाय कार्बन आणि टायटेनियम व्हर्जन मध्ये सुद्धा खरेदी केले जावू शकते. किंमतीत या फोनने कोणतीही तडजोड केली नाही. गोल्ड एडिशनची किंमत २३००० डॉलर (जवळपास १७.२३ लाख) आहे. कार्बन आणि टायटेनियम व्हर्जन ला ५०६० डॉलर (जवळपास ३.७९ लाख रुपये) खेरदी केले जावू शकते. सर्व डिव्हईसेज प्रीमियम फील देते. तसेच ग्राहक याला iPhone 12 Pro किंवा iPhone 12 Pro Max मध्ये निवड करू शकता. वाचाः ऑक्टोबर पर्यंत खरेदीचे ऑप्शन कॅवियारच्या लिमिटेड एडिशन डिव्हाईस ऑक्टोबर आधी उपलब्ध होईल. कारण, अॅपल डिव्हाईसचे अधिकृत मार्केट रिलीज करण्यात उशीर झाला आहे. लग्जरी युजर्सची डिमांडच्या हिशोबानुसार कंपनी फोनला कस्टमाइज करते. तीन डिव्हाईस शिवाय अनेक लिमिटेड एडिशन मॉडल्स सुद्धा घेऊन येईल. ज्यात एग्जॉटिक लेदर आणि गोल्ड पाहायला मिळेल. कंपनी अॅपल आणि सॅमसंग फोनच्या मॉडल्स घेऊन येते. वाचाः लग्झरी स्मार्टफोन्सची क्रेझ एक मोठे मार्केट लग्झरी स्मार्टफोन्सचे आहे. युजर्स लाखो, कोट्यवधी रुपये खर्च करुन फोन तयार करीत आहेत. या सर्व युजर्संसाठी कॅवियार यासारख्या कंपन्या कस्टमाइज करते. कंपनी पोकर कार्ड्स पासून रिस्ट वॉच पर्यंत थीम वर महाग फोन डिझाइन करतेय. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30kHIA6