नवी दिल्लीः २०२० मधील प्रसिद्ध व्हिडिओ शेयरिंग अॅप साठी एक बॅड न्यूज आहे. चायनीज कनेक्शन असल्याने भारतात बंदी घातल्यानंतर एका पाठोपाठ एक देश टिकटॉकवर बंदी घालत आहेत. टिकटॉकचे चीननंतर सर्वात जास्त मार्केट भारतात होते. परंतु, भारतात या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. आता यूएस आणि जपान यासारख्या देशात सुद्धा टिकटॉकवर बंदी घालण्यात येत आहे. मोठा युजरबेस गमवावा लागत असल्याने टिकटॉकसाठी मोठी बॅड न्यूज आहे. वाचाः टिकटॉक अॅपवर युजर्सचा डेटा परवानगी विना विदेशात पाठवण्याचा आणि बाहेरील सर्वरमध्ये स्टोर करण्याचा आरोप लागलेला आहे. डेटा संबंधीत तक्रारी नंतर साऊथ कोरियासह अनेक देशात या अॅपवर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या अॅपची ओळख ही चायनीज असल्याने या अॅपला नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे चीनशी संपूर्ण संबंध तोडून युजर्स वाचवणे हे टिकटॉक समोर एकमेव पर्याय उरला आहे. वाचाः अमेरिकेत बंदीची भीती कंपनीने वारंवार स्पष्टीकरण दिले आहे. टिकटॉकचा स्टाफ हा अमेरिकन आहे. तसेच चायनीज गव्हर्मेंट सोबत युजर्स डेटा कधीच शेयर केला नाही. परंतु, टिकटॉकची पॅरंट कंपनी ByteDance चायनीज आहे. भारतात बंदी घालण्यात आल्यानंतर अमेरिकेतील युजरबेस गमावण्याची भीती कंपनीला सतावत होती. अमेरिकेचे प्रसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या अॅपला बंद करण्याचे म्हटले आहे. यातून वाचवण्यासाठी टिकटॉक आता विकण्यासाठी तयार आहे. वाचाः टिकटॉकची विक्री होऊ शकते The New York Times च्या एका रिपोर्टमध्ये म्हटले की, अमेरिकेत बंदी पासून वाचवण्यासाठी टिकटॉक विकला जाण्याची शक्यता आहे. व्हिडिओ शेयरिंग सर्विसला वाटतेय की, टिकटॉकला मायक्रोसॉफ्ट कंपनीने खरेदी करावे. त्यासाठी कंपनी त्या दिशेने पावलं टाकित आहेत. टिकटॉकचे सीईओ केविन मेयरने नुकतेच म्हटले होते की, टिकटॉकला टार्गेट केले जात आहे. परंतु, आम्ही शत्रू नाहीत. त्यामुळे असे वाटतेय की, या अॅपने आपला पराभव मान्य केला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी टिकटॉकची विक्री करण्यात येवू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fnwrTz