Full Width(True/False)

१० वर्ष जुन्या खास डिझाईनसोबत येतोय iPhone 12

नवी दिल्लीः Apple च्या संबंधीत खूप चर्चा सुरू आहे. या फोनची अनेक लीक्स आणि अफवा समोर आल्या आहेत. आता च्या डिझाइन संबंधी नवीन माहिती आता समोर आली आहे. आता स्मार्टफोन मेकर्सकडे आयफोन १२ ची डमी युनिट्स पोहोचली आहे. यामुळे लाँचिंगवेळी कंपन्या यासाठी फोन केस बनवू शकेल. या डमी युनिट्सने फोन डिझाइनसंबंधी खूप माहिती मिळवली आहे. वाचाः १० वर्ष जुन्या डिझाईनसोबत आयफोन १२ येणार च्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली आहे की, नवीन आयफोनची डिझाईन प्रमाणे असू शकते. हा कंपनीचा १० वर्ष जुने मॉडल आहे. कंपनीने याला २०१० मध्ये लाँच केले होते. याआधी अनेक लिक्स मध्ये हा दावा करण्यात आला होता. आयफोन १२ लाँच करण्यास उशीर iPhone 12 मार्केट मध्ये लाँच होण्यास उशीर झाला आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले की, आयफोन प्रोडक्शनमध्ये उशीर झाल्याने अॅपलचा हा फोन लाँचिंग करण्यास उशीर होतो आहे. आता कंपनीने स्वतः हे कन्फर्म केले आहे की, आयफोन १२ ला लाँचिंग करण्यास उशीर होत आहे. वाचाः ८ सप्टेंबर रोजी होणार होता लाँच काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती की, कंपनी या फोनला ८ सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. परंतु, प्रोडक्शनमध्ये आलेल्या अडचणीमुळे फोनच्या लाँचिंगला उशीर झाला आहे. फोनची किंमत किती असणार कंपनीने आतापर्यंत या फोनच्या किंमतीवरून पडदा हटवला नाही. परंतु, लिक्स झालेल्या माहितीनुसार आयफोन १२ ची किंमत ६४९ डॉलर म्हणजेच ४८ हजार ५०० रुपये किंमत असणार आहे. iPhone 12 Max ची सुरुवातीची किंमत ७४९ डॉलर म्हणजेच ५६ हजार रुपये, iPhone 12 Pro ची सुरुवातीची किंमत ९९९ डॉलर म्हणजेच ७४ हजार ६०० रुपये आणि iPhone 12 Pro Max ची सुरुवातीची किंमत १०९९ डॉलर म्हणजेच ८२ हजार रुपये असू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aDqh0Z