Full Width(True/False)

रियलमीचे इयरबड्स भारतात लाँच, २४ ऑगस्टला सेल

नवी दिल्लीः वायर्ड इयरबड्सला भारतात लाँच करण्यात आले आहे. आणि सोबत लाँच करण्यात आले आहे. Realme Buds 2 नंतर हे नवीन इयरबड्स कंपनीच्या पुढील ऑडियो लाइनअपमध्ये आणले आहे. रियलमी बड्स 2 ला गेल्या वर्षी भारतात लाँच करण्यात आले होते. याची किंमत ५९९ रुपये होती. रियलमी बड्स क्लासिक इन-लाइन रिमोटसोबत येते. याशिवाय या इयरबड्समध्ये नॉन आयसोलेटिंग फीट शिवाय हाफ इन इयर डिझाइन दिली आहे. या इयरबड्सला दोन रंगात उपलब्ध करण्यात येणार आहे. वाचाः Realme Buds Classic ची किंमत रियलमी बड्स क्लासिकची भारतात किंमत ३९९ रुपये आहे. तर ब्लॅक आणि पांढरा या दोन रंगात पर्यात मिळणार आहे. दोन्ही कलरच्या बड्चा सेल २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता Amazon आणि Realme India ची वेबसाइटवर आयोजित करण्यात आली आहे. रियलमी बड्स क्लासिक सोबत रियलमीने आपला पसंतीचा पांढरा रंगाचा टी शर्ट सुद्धा लाँच केला आहे. हा टी शर्ट ४ सप्टेंबर पासून कंपनीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. वाचाः Realme Buds Classicचे फीचर्स रियलमीने यात 14.2mm ऑडियो ड्राइवर दिला आहे. इयरबड्स मध्ये बिल्ट-इन हाय डेफिनेशन (HD) मायक्रोफोन आणि म्यूजिक प्लेबॅक कंट्रोल साठी रिमोट दिला आहे. खिशातून फोन न काढता रिमोटच्या माध्यमातून कॉल करता येवू शकतो. Realme Buds 2 प्रमाणे रियलमी बड्स क्लासिक मध्ये सुद्धा मॅग्नेटचा समावेश करण्यात आला नाही. नवीन इयरबड्सची डिझाइन खूप वेगवळी आहे. इयरबड्सचा गोल आकार आरामात कानात फीट होतो, असा कंपनीचा दावा आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h9ExAX