Full Width(True/False)

Jio vs एयरटेल vs वोडाफोन: रोज १.५ GB डेटा आणि फ्री कॉलिंगचे बेस्ट प्लान

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या युजर्ससाठी जबरदस्त प्रीपेड प्लान ऑफर केले आहेत. युजर्संना सध्या जास्त वैधता असलेले प्लान खूप पसंत पडत आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी रिलायन्स जिओ, वोडाफोन आणि एअरटेलमध्ये मिळणाऱ्या ५६ दिवसांची वैधता असलेल्या प्लानसंबंधी माहिती देत आहोत. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात रोज १.५ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग सोबत अतिरिक्त बेनिफिट्स मिळतात. वाचाः एअरटेलचा ३९९ रुपयांचा प्लान ५६ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना रोज १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. रोज १०० फ्री एसएमएस ऑफर केले जातात. तसेच एअरटेल एक्स्ट्रीम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला फास्ट टॅगच्या खरेदीवर १५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. वाचाः वोडाफोनचा ३९९ रुपयांचा प्लान वोडाफोनच्या या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कंपनी सुरुवातीला २८ दिवसांसाठी ५ जीबी एक्स्ट्रा डेटा देते. तसेच प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. हा प्लान वोडाफोन प्ले आणि झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन सोबत येतो. वाचाः वाचाः रिलायन्स जिओचा ३९९ रुपयांचा प्लान ५६ दिवसांच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते तर अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी २ हजार मिनिट्स मिळतात. रोज १०० SMS फ्री मिळते. या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FrnDjk