Full Width(True/False)

सुशांत नक्की कोणाच्या घराचे हफ्ता भरत होता? सत्य आलं समोर

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री हिच्या घराचे भरत होता, असं ईडीच्या चौकशीत समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ब्रेकअप नंतर दोघंही एकमेकांच्या संपर्कात नव्हते, मग सुशांत अंकिताच्या घराचे हफ्ते का भरत होता, असे अनेक प्रश्न अंकिताला विचारण्यात येत होते. त्यानंतर अंकितानं तिच्या घराचे कागदपत्र आणि बॅंक अकाउंटचे स्टेटमेंट्स शेअर केले.या सर्व प्रकरणावर तिनं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. पण सुशांतनक्की कोणाच्या घराचे हफ्ते भरत होता हे आता समोर आलं आहे. सुशांत आणि अंकिता तब्बल सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. २०१६ या वर्षी ते लग्नही करणार होते. म्हणून त्यांनी एक घर खरेदी केलं होतं. मालाड इथं एका अलिशान इमारतीत दोन फ्लॅट घेऊन त्यांनी एकच मोठा फ्लॅट बनवला होता. दोघंही या घरात राहायचे.दोन फ्लॅट्स पैकी एक अंकिताच्या तर एक सुशांतच्या नावावर आहे. अंकिता तिच्या नावावर असलेल्या फ्लॅटचे हफ्ते भरतेय, तर सुशांत त्याच्या नावावर असलेल्या फ्लॅटचे हफ्ते भरत होता. हा फ्लॅट अद्यापही त्याच्याच नावावर आहे. पण अंकिता तिच्या कुटुंबियांसोबत इथं राहत असल्यानं तिच्यावर आरोप करण्यात येत आहेत. सुशांतच्या बहिणीनं दिली प्रतिक्रिया अंकिताच्या घराचे हफ्ते सुशांतच्या बॅंक अकाऊंटमधून जात असल्याचं म्हटलं गेल्यानंतर अंकितानं तिचे बॅंक डिटेल्स शेअर केले यावर सुशांतच्या बहिणीनं अंकिताचं कौतुक केलं असून तू एक स्वतंत्र मुलगी आहेस, त्याचा मला अभिमान आहे', असं तिनं म्हटलं आहे. बॉयफ्रेंडनं ही दिली साथ अंकितानं तिचे बॅंक डिटेल्स शेअर केल्यानंतर बॉयफ्रेंड यानं देखील तिला पाठिंबा दिला आहे. 'मानलं तुला, मला तुझा अभिमान आहे मीस लोखंडे', असं विकीनं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YbCm8I