Full Width(True/False)

LG K31 मध्ये दोन रियर कॅमेरे, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः LG ने एन्ट्री लेवल स्मार्टफोन ला अमेरिकेत लाँच केले आहे. के सीरीजचा हा नवीन हँडसेट मध्ये नॉच डिस्प्ले, दोन रियर कॅमेऱ्यासोबत येतो. फोनमध्ये गुगल असिस्टेंट साठी वेगळे बटन दिले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कंपनीने जुलै महिन्यात अमेरिकेत T-Mobile वर LG Aristo 5 हँडसेट सुद्धा लाँच केला होता. वाचाः LG K31:ची किंमत एलजी के ३१ फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. याची किंमत १४९.९९ डॉलर म्हणजे जवळपास ११ हजार २०० रुपये ठेवण्यात आली आहे. फोन सिल्वर कलर ऑप्शनमध्ये येतो. अमेरिकेत एलजीची वेबसाईट वरून हा फोन खरेदी करता येवू शकतो. अमेरिकेबाहेर हा फोन कधीपर्यंत लाँच करण्यात येणार आहे, यासंबंधी कंपनीने अद्याप काहीही माहिती दिली नाही. वाचाः LG K31:चे खास वैशिष्ट्ये एलजीच्याया फोनमध्ये ५.७ इंचाचा एचडी प्लस फुल व्हिजन डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन च्या पिक्सल डेनसिटी 295 पीपीआय आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज़ आहे. एलजी के ३१ मध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर व २ जीबी रॅम उपलब्ध आहे. फोनमध्ये ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज वाढवता येवू शकते. वाचाः वाचाः एलजीचा हा फोन सिंगल सिम सपोर्ट करतो. तसेच अँड्रॉयड १० बेस्ड LG UX 9.1 वर काम करतो. फोनमध्ये रियरवर १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ५ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आहे. तसेच फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये वाय फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि मायक्रो-यूएसबी पोर्ट दिले आहेत. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यात 3000mAh बॅटरी दिली आहे. ११ तासांपर्यंत टॉ़कटाईम मिळण्याचा कंपनीचा दावा आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hn4oFL