नवी दिल्लीः प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी भारतात २१ सप्टेंबर रोजी नवीन Narzo 20 स्मार्टफोन सीरीज लाँच करणार आहे. सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन Narzo 20A, Narzo 20, आणि Narzo 20 Pro घेवून येत आहे. लाँचिंग आधी या तीन्ही फोनपैकी सर्वात पॉवरफुल फोन नार्जो २० प्रोचे वैशिष्ट्ये समोर आली आहेत. प्रसिद्ध टिप्स्टर मुकुश शर्मा यांनी फोनचे सर्व फीचर्स जारी केले आहेत. वाचाः डिस्प्ले आणि प्रोसेसर रिपोर्टमध्ये रियलमी नार्जो २० स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि रेजॉलूशन 1080 x 2400 पिक्सल आहे. स्मार्टफोनमध्ये 90.5 टक्क्याची स्क्रीन-टू-बॉडी रेशियो मिळू शकते. यात ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम सोबत ६४ जीबी आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेजचे पर्याय मिळू शकते. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ९५ प्रोसेसर सोबत येवू शकते. वाचाः कसा असेल कॅमेरा फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स सोबत २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्स दिला जाणार आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर मिळू शकतो. फोन अनलॉक करण्यासाठी यात साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर दिला जावू शकतो. वाचाः वाचाः बॅटरी आणि चार्जिंग स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळू शकते. जी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. फोनच्या किंमती संदर्भात अद्याप काहीही माहिती समोर आली नाही. फोन दोन कलरमध्ये ब्लॅक आणि व्हाइट रंगात मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZMKz42