नवी दिल्लीः शाओमीकडून गेल्या आठवड्यात बजेट सेगमेंटमध्ये नवीन फोन लाँच करण्यात आला आहे. एन्ट्री लेवल किंमतीत हा फोन पॉवरफूल फीचर्ससोबत येतो. 5000mAh बॅटरी आणि फोनमध्ये P2i कोटिंग मिळते. आज दुपारी १२ वाजता अॅमेझॉन Mi.com आणि Mi Home Stores वर फ्लॅश सेल होणार आहे. वाचाः किंमत आणि ऑफर्स रेडमी ८ ए ला भारतात दोन रॅम आणि स्टोरेजमध्ये उतरवले आहे. २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६ हजार ७९९ रुपये आहे. तर ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन तीन कलरमध्ये खरेदी करता येवू शकतो. या फोनला ऑफलाइन वरून सुद्धा खरेदी करता येवू शकते. वाचाः या फोनच्या ऑफर्समध्ये अॅमेझॉनवर नो कॉस्ट ईएमआयचे ऑप्शन सिलेक्टेड कार्ड्सवर मिळत आहेत. HSBC कॅशबॅक कार्डवर ५ टक्के तात्काळ डिस्काउंट मिळत आहे. अॅमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्ड फॉर प्राईम मेंबर्सला ५ टक्के सूट दिली जात आहे. तर नॉन प्राईम कार्ड होल्डर्सला ३ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः Redmi 9A चे वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस LCD डॉट ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल्स आहे. डिस्प्ले चा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 वर काम करतो. पॉवरफुल परफॉर्मन्स साठी या फोनमध्ये मीडियाटेक चा ऑक्टा-कोर Helio G25 चिपसेट दिला आहे. फोनमध्ये रियर पॅनेलवर १२ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा दिला आहे. सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमच्या डिस्प्लेच्या चारही बाजुला मोठे बेजल्स दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. या बॅटरीला 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GDghd7