Full Width(True/False)

सुशांत वॅनिटी व्हॅनमध्येच घ्यायचा ड्रग्ज, अभिनेत्रींनी दिला जबाब

मुंबई- नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने केलेल्या चौकशीत दीपिका पादुकोणने तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशशी ड्रग्ज चॅट केल्याचं मान्य केलं असलं तरी कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज घेण्यावर स्पष्टपणे नकार दिला. दुसरीकडे सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनीही त्या ड्रग्ज घेत नसल्याचं म्हटलं. मात्र, या चौकशीत सारा आणि श्रद्धाने सुशांतच्या ड्रग्ज घेण्याविषयी अनेक खुलासे केले. श्रद्धा 'छिछोरे' सक्सेस पार्टीत हजर होती एनसीबी चौकशी दरम्यान श्रद्धा कपूर म्हणाली की ती सुशांतच्या फार्महाऊसवर झालेल्या 'छिछोरे' च्या सक्सेस पार्टीमध्ये गेली होती. श्रद्धा म्हणाली की त्या पार्टीत ड्रग्ज घेतले गेले नव्हते फक्त ड्रिंक्स देण्यात आले होते. श्रद्धाने हेही मान्य केलं की ती जया साहाशी बोलायची पण तिने कधीही ड्रग्ज घेतले नाहीत. एबीपी लाइव्हच्या अहवालानुसार श्रद्धा कपूर म्हणाली की सुशांत त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अनेकदा ड्रग्ज घ्यायचा. साराही म्हणाली- सुशांत घ्यायचा ड्रग्ज सुशांत अधूनमधून ड्रग्ज घेत होता असा जबाब सारा अली खानने म्हटलं. साराने त्याच्याबरोबर थायलंडला जाण्याचंही मान्य केलं. तसंच साराने कधीही ड्रग्ज घेतले नसल्याचं म्हटलं. पण ती सिगारेट ओढत असल्याचं चौकशीत मान्य केलं. दीपिका म्हणाली- मित्रांसोबत ओढते सिगारेटदीपिका पादुकोणची सीबीआयने चौकशी केली असता ती मित्र- मैत्रिणीसोबत सिगारेट ओढते असं मान्य केलं. यालाच ते डूब म्हणतात. पण यात कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नसतात असंही ती म्हणाली. डूब हे त्यासाठीचं कोडवर्ड आहे. मात्र, गप्पांमध्ये तिने 'वीड' आणि 'हॅश'चा उल्लेख का केला याचं उत्तर तिने देणं टाळलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jcGY6Y