मुंबई- अनेकजण आज २७ सप्टेंबरला 'Daughter Day' साजरा करत आहेत. यात बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या आयुष्यातील मुलीचं किती महत्त्व आहे ते सांगितलं. अमिताभ बच्चनपासून आयुष्मान खुरानापर्यंत अनेकांनी आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर केले. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी 'Daughter Day' निमित्त मुलगी श्वेता बच्चनसोबतचा फोटो शेअर केला. यात बाप-लेकीचं प्रेमळ नातं दिसून येतं. या फोटोला कॅप्शन देताना बिग बी यांनी लिहिले की, 'हॅपी ' हा दिवस मी माझ्या मुलीला दररोज समर्पित करतो.' त्याचवेळी अजय देवगणने मुलगी न्यासाचा फोटो शेअर केला. अजयने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझी मुलगी न्यासा ही अनोखी आहे. माझी पहिली आलोचक. ही माझी सर्वात मोठी शक्ती आणि माझी कमकूवत बाजी आहे. ती आता मोठी झाली असली तरी माझ्या आणि काजोलसाठी ती नेहमीच लहान असणार आहे. डॉटर्स डेच्या शुभेच्छा. ' याशिवाय डॉटर्स डे वर अनेक सिलिब्रिटींनी सोशल मीडिया पोस्ट शेअर केले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2S3btjQ