मुंबई: याच्या मृत्यूनंतर सीबीआय , एनसीबी आणि ईडी मार्फत वेगवेगळ्या अॅंगलनं तपास सुरू आहे. सुशांतची गर्लफ्रेंड हिची आज सलग दुसऱ्या दिवशी एनसीबीकडून कसून चौकशी सूरू आहे. पण या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे रियानं केले आहेत. एनसीबीच्या चौकशीच्या दुसर्या दिवशी रिया चक्रवर्ती हिनं पुन्हा एकदा दावा केला आहे की तिनं सुशांतसाठी ड्रग्ज विकत घेतले होते. पण तिनं कधीही त्याचा वापर केला नाही. इतकंच नाही तर गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या युरोप ट्रीप संदर्भातही रियानं मोठा खुलासा केला आहे. गेल्या महिन्यात ईडीने केलेल्या चौकशी दरम्यान, इटलीतील एका हॉटेलमधील जुनं पेन्टींग पाहून सुशांतची तब्येत बिघडली म्हणून युरोप ट्रीपवरून लवकर परतल्याचं रियानं म्हटलं होतं. परंतु आता एनसीबीच्या चौकशीत तिनं वेगळंच कारण सांगितलं आहे. सुशांतला ड्रग्जचं व्यसन होतं. युरोप ट्रीप दरम्यान ड्रग्ज मिळाले नाहीत, त्यामुळं त्यानं लवकर भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता,असं रियानं एनसीबीच्या चौकशीत सांगितलं असल्याची माहिती आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZdUu2k