Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सावर ऐकायला मिळणार अमिताभ बच्चन यांचा आवाज

मुंबई'देवीयों और सज्जनों...' हे शब्द तुम्ही बिग बींच्या त्या खास टोनमध्येच वाचले असणार; ज्याप्रमाणे ते केबीसीमध्ये आपल्या भारदस्त आवाजात उच्चारतात. प्रेक्षकांच्या लाडक्या '?' या कार्यक्रमातून घराघरामध्ये पोहचलेला यांचा हाच आवाज आता थेट अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून सर्वांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. होय, खरोखरच आता अमिताभ यांचा आवाज अ‍ॅलेक्सावर ऐकायला मिळणार आहे.अ‍ॅमेझॉनच्या व्हॉइस असिस्टंट सर्व्हिसनं अलेक्सासाठी पहिल्यांदाच भारतीय कलाकाराच्या आवाजाची निवड केली आहे. 'बच्चन अलेक्सा' असं या नविन फिचरचं नाव ठेवण्यात आलं आहे. 'बच्चन अलेक्सा' २०२१ पासून ग्राहकांना वापरता येणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात जोक, हवामानासंदर्भात माहिती आणि कविता ऐकता येणार आहेत. यासाठी ग्राहकांना काही रक्कम भरावी लागणार आहे. "Alexa, say hello to Mr. " या व्हॉइस कमांडच्या मदतीने ही सुविधा अ‍ॅक्टीव्हेट करता येणार आहे. 'टेक्नॉलॉजीमुळे मला नेहमीच नवीन गोष्टींसह जोडण्याची संधी दिली आहे. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आणखी लोकांपर्यंत मला पोहोचता येईल याचा मला विशेष आनंद आहे', असं या कराराबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RxJHvK