Full Width(True/False)

'देवियों और सज्जनो...' केबीसीमध्ये पहिल्यांदाच होणार 'हे' बदल

मुंबई: 'देवियों और सज्जनो...' असं म्हणत महानायक पुन्हा एकदा ' 'चा नवा सीझन घेऊन येत आहेत. आज पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करोनामुळं काही बंधनं आणि नियमांचं पालन करत या १२ व्या पर्वाचं शूटिंग सुरू आहे. या पर्वात काही नवीन बदल ही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. काय असतील बदल? * यंदा कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाही. पण हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी IPLमध्ये देण्यात आलेला प्रेक्षकांचा आवाज एपिसोड एडीट करताना देण्यात येणार आहे. * सेटवर प्रेक्षक नसल्यामुळे ‘ऑडियन्स पोल’ ही लाइफलाइन काढण्यात आली आहे. त्या जागी आता ‘व्हिडीओ अ फ्रेंड’ ही जुनी लाइफलाइन पुन्हा स्पर्धकाला खेळताना वापरता येणार आहे. * आता स्पर्धकाला ११ ऑप्शन असणार आहेत. त्यामध्ये ‘my city, my state’ ही नवी कॅटेगिरी अॅड करण्यात आली आहे. यात स्पर्धकांच्या निवडलेल्या राज्यावर प्रश्न विचारण्यात येईल. * पहिल्या पाच प्रश्नांसाठी स्पर्धकाला ४५ सेकंदाची वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढच्या पाच प्रश्नांसाठी ६० सेकंदाची वेळ देण्यात येणार आहे. * दर वेळी शोमध्ये फास्टेस्ट फिंगरमध्ये १० असतात. पण यंदा ८ असणार आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी स्पर्धकांची संख्या कमी करण्यात आली आहे. * हॉट सीटवर बसणारा स्पर्धक आणि बिग बीं यांच्यामधील अंतर वाढवण्यात आले आहे. * शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकाची निवड केल्यानंतर त्याची त्याच्या राज्यात करोना चाचणी होईल. पुढे मुंबईत आल्यावर देखील करोना चाचणी होईल आणि नंतर त्याला मुंबईमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर शोमध्ये सेटवर त्याला येता येईल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j93vBy